Breaking News

दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार, विष पाजून केली हत्यानराधमांना कडक शासन करा-पप्पु कागदे


बीड :  जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील टोळी येथील दलित तरूणीवर सामुहिक बलात्कार करून, तिला विष पाजून हत्या करण्यात आली. या घटनेतील नराधमांना कडक शासन करण्यात यावे अशी मागणी युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पु कागदे यांनी केली आहे.

टोळी गावातील रहिवासी असलेले आरोपी शिवानंद शालिक पवार, पप्पू अशोक पाटील आणि अशोक वालजी पाटील या तिघांनी पीडितेचे अपहरण करत तिच्यावर सामूहिक अत्याचार करून तीची हत्या करण्यात आली आहे.  यातील शिवानंद पवार हा पीडितेवर मैत्री करण्यासाठी दबाव टाकत असे. पीडितेने धुळे येथे उपचारासाठी नेत असताना नातेवाईकांना घटनेबाबत माहिती दिली. 7 नोव्हेंबर रोजी संशयित आरोपींनी पीडितेला गुंगीचे औषध देऊन तिचे पारोळा शहरातून अपहरण केले. त्यानंतर तिला एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे अज्ञातस्थळी नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. पीडितेने प्रतिकार केला असता, तिघा नराधमांसह एका अनोळखी महिलेने पीडितेला शिवीगाळ करत बळजबरीने विष पाजून तिच्या मृत्यूस करणीभूत ठरले आहेत. या घटनेतील सर्व आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पु कागदे यांनी केली आहे.


आंध्र प्रदेशच्या धर्तीवर
‘दिशा’ कायदा लागु करा

दिशा कायद्यात कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत. बलात्कार, सामूहिक बलात्कार अशा गुन्ह्यांत आरोप सिद्ध झाल्यास दोषीला 21 दिवसांत शिक्षा देण्यात येणार आहे. या कायद्यात फाशीच्या शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे. बलात्काराच्या गुन्ह्यात एफआयआर दाखल झाल्यानंतर 21 दिवसांमध्ये सुनावणी पूर्ण करून आरोप व गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्याप्रकरणी तत्काळ शिक्षा देण्याची तरतूद या कायद्यात आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 354 मध्ये दुरुस्ती करून नवे 354 (ई) हे कलम तयार करण्यात आले आहे. अशाप्रकारे कायदा करणारे आंध्र प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आंध्र प्रदेशच्या धर्तीवर ‘दिशा’ कायदा लागु करावा अशी मागणी पप्पु कागदे  यांनी केली आहे.  
No comments