Breaking News

आष्टी इंजिनिअरिंग कॉलेजचा शंभर टक्के निकाल


आष्टी :  येथील  आनंद चॅरिटेबल संस्थेचे डिप्लोमा इन इंजिनेअरिंग टेक्नोलॉजी ( पॉलटेक्निक) कॉलेज चा  निकाल जाहीर झाला असून कॉलेज ची निकालाची परंपरा कायम राखून ठेवत १०० % निकाल लागला आहे या निकालाचे सर्व श्रेय कॉलेज चे अनुभवी प्राध्यापक वर्ग यांचे मार्गदर्शन व मेहनत तसेच विद्यार्थीचा अभ्यासु चिकाटी पणा यामुळे कॉलेज ची निकालाची परंपरा कायम राखण्यात यश आले आहे.

     

कॉलेज मधील गुणवंत शेवटचे तृतीय वर्ष मेकॅनिकल ब्रँच विद्यार्थी तरटे प्रशांत भारत ८१.१८%(प्रथम), कुलकर्णी स्मिता सुभाष ७८.२१ % ( द्वितीय ), काकडे गजेंद्र बाळासाहेब ७८.१०% (तृतीय )  , कॉम्पूटर ब्रँच तृतीय वर्ष जगताप प्रिया रावसाहेब ७७.०९ % ( प्रथम ) सिव्हील इंजिनिअरिंग तृतीय वर्ष राख योगेश राजेंद्र ७८.५८ % ( प्रथम ), वाणी मंगेश लक्ष्मण ७७.२१% ( द्वितीय ), शिंदे शितल बाळासाहेब  ७६.६८ % ( तृतीय ),  वेगवेगळ्या विषयांत १०० पैकी १०० मार्क मिळवणारे दहा विद्यार्थी आहेत तर विशेष प्राविण्य मध्ये ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व प्रथम श्रेणीत ३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत या सर्व गुणवंत विद्यार्थी यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार भीमरावजी धोंडे  , प्रशासन अधिकारी श्री डॉ.डी बी राऊत , शिवदास विधाते ,दत्तात्रय गिलचे , माऊली बोडखे, संजय शेंडे, प्राचार्य महेश झगडे, उप प्राचार्य संजय बोडखे यांनी अभिनंदन केले आहे.
No comments