Breaking News

विज बिल माफ करा संभाजी ब्रिगेडचे तहसीलदारांना निवेदन


गौतम बचुटे । केज    

तालुक्यातील ग्राहकांचे वीज बिल माफ करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे. 

या बाबतची माहिती अशी की, कोरोनाच्या संकटाने शेतकरी व व वीज ग्राहक त्रस्त आहे. तसेच ऊर्जा मंत्री ना. नितीन राऊत यांनी १०० युनिट विज बिल माफी संदर्भात घोषणा केलेली असतानाही वाढीव वीज बिले आलेले आहेत. या बद्दल आज दिनांक २४ नोव्हेंबर रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसीलदार  मेंडके यांना विज बिल माफ करावे. या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आले. निवेदनाच्या प्रती या ऊर्जामंत्री आणि विविध विभागांना देण्यात आले आहेत.


No comments