Breaking News

पंकजाताई मुंडे यांनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट


शेतक-यांना दिलासा, नोकरभरती बाबत केली चर्चा; दिवाळीच्याही दिल्या शुभेच्छा

मुंबई :  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी  राजभवनात जाऊन सदिच्छा भेट घेतली व विविध विषयांवर चर्चा केली तसेच त्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या.

   पंकजाताई मुंडे यांनी यासंदर्भात ट्विट करून राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीची माहिती दिली. राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतक-यांच्या पिकांचे फार मोठे नुकसान झाले होते. पंकजाताई मुंडे यांनी स्वतः शेतक-यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीची पाहणी केली होती, याबाबत त्यांनी राज्यपालांना माहिती दिली. राज्यातील कोरोनाची परिस्थिती, अतिवृष्टीतील शेतक-यांना दिलासा तसेच नोकरभरती या विषयावर त्यांनी राज्यपाल महोदयांनी चर्चा केली तसेच त्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. 




No comments