रुईमध्ये कोजागिरी पौर्णिमा उत्साहात
वडवणी : तालुक्यातील मौजे रुई पिंपळा याठिकाणी कोजागिरी पौर्णिमेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी तथागत गौत्तम बुध्द आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन सामुहिक बुध्द वंदना घेण्यात आली.
यात सर्वप्रथम बुध्द आणि आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाउपध्यक्ष आण्णासाहेब मस्के,भालेराव मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब साळवे,बहुजन विकास मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब वाघमारे,धनगर कृती संघर्ष समितीचे दत्ता वाकसे यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी रमेश गवळी, तुकाराम गवळी, गोरख आंधळे,बालाजी आंधळे विकास आंधळे, सदाशिव आंधळे, दादा शेख, अविनाश गवळी, मनोज गवळी, दलीत गवळी यांच्यासह आदी जण उपस्थित होते.तर समाज बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुध्द वंदना, बुध्द गाथा यानंतर खिरीची वाटप केले.
No comments