Breaking News

शिक्षण क्षेत्रावरील संकटे दूर करण्यासाठी हक्काचा माणूस रमेश भाऊ पोकळे यांना प्रथम पसंती देऊन विजयी करा - गणेश आजबे


बीड : मराठवाडा पदवीधर मतदार संघाची निवडणूक  लागलेली आहे या निवडणुकीत  आपल्या सर्वांचा हक्काचा माणूस  निष्कलंक सामान्य जनतेशी ज्याची नाळ जुळलेली आहे अश्या माणसाला आपल्या मराठवाडा शिक्षक संघाने पाठींबा दिला आहे म्हणजे मराठवाडा शिक्षक संघ पुरस्कृत उमेदवार म्हणून रमेश भाऊ पोकळे यांना उमेदवारी दिली आहे कारण काँग्रेस व  राष्ट्रवादी च्या काळात सुरू झालेले विनाअनुदानित धोरण आजही तसेच आहे आणि भाजपच्या काळात त्यात काहीही बदल झाला नाही म्हणजे नागनाथ का भाई सापनाथ ही परिस्थिती आहे.

 

तसेच जुनी पेंशन योजना च्या बाबतीत न बोललेले बरं कारण आमदार खासदार याना पेन्शन पण सामान्य कर्मचाऱ्याला पेन्शन नाही  आजपर्यंत या दोन्हीही सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता बुडवला त्यावर कोणताही म्हणजे पदवीधर किंवा शिक्षक आमदार काहीही बोलत नाहीत कारण ते पक्षाचे आमदार आहेत असे अनेक संकटे हे शिक्षक शिक्षकेत्तर प्राध्यापक आय. टी.आय. निदेशक यांच्यावर आले पण आपला हक्काचा माणूस विधानपरिषदे मध्ये नसल्याने आपलं खूप नुकसान झाले आहे आणि भविष्यात होऊ नये म्हणून मराठवाडा शिक्षक संघाने   कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा न देता निष्कलंक निस्वार्थी चळवळीतील सामान्य माणसाला जो आपल्या प्रश्नाला योग्य रित्या सभागृहात वाचा फोडू शकतो अश्या च माणसाला आपल्या संघटनेने पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केले आहे अश्या उमेदवाराला आपण प्रथम पसंतीचे मत देऊन प्रचंड मतनी विजयी करावे असे आवाहन मराठवाडा शिक्षक संघाचे गणेश आजबे जिल्हाध्यक्ष डी.जी.तांदळे जिल्हा सचिव राजकुमार कदम  कालिदास धपाटे विनोद सवासे युवराज मुरूमकर  पुरुषोत्तम येडे बी.ती. खाडे सुनील नागरगोजे  बंडू आघाव  यांनी केले आहे.


No comments