Breaking News

मापाडी यांचे पणन महासंघ समोरील उपोषण आश्वासनानंतर मागेपणन महासंघाचे उपाध्यक्ष ॲड. विष्णु सोळंके यांनी रक्कम मिळवून देण्याची दिली हमी 

परळी : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या येथील विभागीय कार्यालयासमोर सोमवार दिनांक २ नोव्हें.रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती केजचे मापाडी १३ लाख ४० हजार१२७ रुपयांची थकित तोलाई मिळावी म्हणून आमरण उपोषणास बसले होते.

 सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान पणन महासंघाचे उपाध्यक्ष ॲड.विष्णु सोळुंके,व विभागीय व्यवस्थापक श्री एस.एस.इंगळे यांच्या लिखित आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.यावेळी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अनंत गित्ते यांनी यशस्वी मध्यस्थी केली. याविषयी सविस्तर असे की,कृषी उत्पन्न बाजार समिती केज चे मापाडी गौतम विश्वनाथ थोरात, पांडुरंग तुकाराम तांदळे,ज्ञानेश्वर रामभाऊ इंगळे,दत्तात्र्य विष्णू ढगे, त्र्यंबक विष्णू समुद्रे,तुकाराम राजाराम मेटे,अशोक मोराळे या मापाडी यांनी २०१९-२०(गतवर्षी)केज मार्केट अंतर्गत विविध जिनिंग वरती कापूस खरेदीसाठी मापाडी म्हणून काम केले होते.

ज्या कामाची रक्कम १३ लाख ४० हजार १२७रू.इतकी महासंघाकडून बाकी येणे होती या रकमेसाठी पणन महासंघाच्या परळी येथील विभागीय कार्यालयाकडे वारंवार मागणी करूनही रक्कम मिळत नव्हती. वरील मापड यांनी या रकमेसाठी  आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबून सोमवार दि.२ नोव्हेंबर सकाळपासून येथील पणन महासंघाच्या विभागीय कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली.ही बाब परळी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अनंत गित्ते यांना समजताच त्यांनी उपोषणस्थळी जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली व लगेच महासंघाचे उपाध्यक्ष एडवोकेट विष्णू सोळंके यांच्या कानी घालत मापाडी यांच्या अडचणी लक्षात आणून दिल्या. त्यानंतर पणन महासंघाचे उपाध्यक्ष ॲड.विष्णू सोळंके, विभागीय प्रभारी व्यवस्थापक एस. एस. इंगळे यांनी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान उपोषणस्थळी भेट देत उपोषणकर्त्यांशी चर्चा केली व केज  मार्केट कमिटीचे मापाडी यांची थकीत रक्कम १३ लाख ४० हजार १२७ रू.लवकरात लवकर मिळवून देण्याची हमी घेतली.आणि तसे लिखित स्वरुपात दिल्याने वरील मापडी यांनी आपले उपोषण मागे घेतले यावेळी ॲड. विष्णु सोळुंके, एस. एस. इंगळे, पत्रकार अनंत गित्ते यांनी उपोषणकर्त्यांना लिंबू शरबत देऊन उपोषणाची सांगता केली. No comments