Breaking News

शिवसंग्राम बीड जिल्ह्यातील सर्व नगरपंचायती लढणार - धांडे

५ नगरपंचायतीच्या प्रभारी निवडी जाहीर

बीड : शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषद बीड जिल्ह्यातील आगामी निवडणूका लढणार असून आज 5 नगरपंचायतीच्या प्रभारी निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. या निवडी प्रदेश सरचिटणीस सुदर्शन धांडे यांनी जाहीर केल्या आहेत. 

          बीड जिल्ह्यातील केज, पाटोदा, वडवणी, शिरूर (का.), आष्टी या ठिकाणी नगरपंचायती निवडणुका लवकरच होत आहेत. आष्टी नगरपंचायती प्रभारी पदी प्रभाकर कोलंगडे, सुहास पाटील, केज - नाविद्वजुम्मा, रामहरी मेटे, शिरूर का. - लक्ष्मण ढवळे, नारायण काशीद, वडवणी - सुधीर काकडे, मीराताई डावकर, पाटोदा - सुदर्शन धांडे, सुनील शिंदे या प्रभारी निवडी जाहीर झाल्या आहेत.


No comments