Breaking News

डॉ. अशोक थोरातांची बदली झाली अन जिल्ह्या 'रुग्ण' ही गहिवरले...


डॉ. थोरातांना शुभेच्छा तर जिल्हा शल्यचिकित्सक पदी येणारे डॉ. गित्ते यांचे स्वागत 

बीड  : कोरोनाच्या काळात एक दिवस ही सुट्टी न घेता अहोरात्र काम करणारे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात !  सामान्य कार्यकर्त्यांच्या एका फोनवर प्रश्न सोडवून रुग्ण सेवेतील अडचण तात्काळ दूर करुन नातेवाईकांना दिलासा देत सर्वांना आपलेसे करणाऱ्या डॉ. थोरात यांची नुकतीच बदली झाल्याने सामाजिक कार्यकर्त्यांसह जिल्ह्या ' रुग्ण'  गहिवरून गेले आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांचे खंदे समर्थक अजय सुरवसे यांनी डॉ. थोरात यांना शुभेच्छा दिल्या असून त्यांची जागी येत असलेल्या डॉ. सूर्यकांत गित्ते यांचे ही स्वागत केले आहे. 


तीन वर्षे तीन महिने डॉ. अशोक थोरात जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून कार्यरत असताना रुग्णालयात रुग्णांना तात्काळ आरोग्य विषयक सेवा मिळाव्यात यासाठी ते कटाक्षाने लक्ष देत.  बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र असल्याने त्यांनी आपल्या जिल्ह्यातील आपल्या माणसांची सेवा करण्यासाठी रात्र असो की, दिवस कधीच त्याचा डॉ. थोरात यांनी विचार केला नाही. 

सामाजिक कार्यकर्त्याच्या एका फोन वर समस्या निवारण केले , कोरोनाच्या काळात एक हि दिवस सुट्टी न घेता सेवाधर्म जपला. म्हणूनच हा भूमिपुत्र कोरोनाच्या काळात  मराठवाड्यात सर्वात चांगलं काम करणारे सिव्हील सर्जन ठरले. डॉ. थोरात यांची काम करण्याची पद्धतीमुळे त्यांनी रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी एक आपुलकीचे नाते घट्ट केले.अशी प्रतिक्रिया संदीप क्षीरसागर यांचे खंदे समर्थक अजय सुरवसे यांनी व्यक्त केली असून डॉ. थोरात यांना शुभेच्छा देत जिल्हा शल्य चिकित्सक बीड जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या डॉ. सूर्यकांत गित्ते यांचे जिल्हा रुग्णालयातील आमदार संदीप क्षीरसागर मदत केंद्राच्या वतीनं सुरवसे यांनी स्वागत केले आहे.

No comments