Breaking News

सुशिक्षीत बेरोजगारांसाठी कायम रस्त्यावर येऊन संघर्ष करणाऱ्या रमेश पोकळेंना उमेदवारी द्या - सर्जेराव तांदळे, राजेंद्र बांगर, गोकुळ सानप



शिरूर कासार : भाजप पक्षवाढीसाठी व पक्षाचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे व सुशिक्षीत बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम प्रयत्नशील असलेले अभ्यासू नेतृत्व रमेशराव पोकळे मराठवाडा पदवीधर मतदार संघात प्रभावी उमेदवार असुन भाजपने पोकळेंनाच उमेदवारी द्यावी त्यांच्या उमेदवारीतच विजय असल्याने पक्षाच्या नेत्यांनी इतर कोणालाही उमेदवारी न देता कायम जनसंपर्कात असलेल्या रमेश पोकळेंनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी बीड नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हासरचिटणीस  सर्जेराव तात्या तांदळे, भाजपा महासचिव राजेंद्र आण्णा बांगर , भाजप विद्यार्थी आघाडी बीड जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ सानप यांनी एका प्रसिध्दी पञकाव्दावारे केली आहे.

यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात तांदळे , बांगर , सानप यांनी म्हटले आहे की लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखालील राजकारणात प्रवेश झालेले व मुंडे साहेबांच्या मुशीत राजकीय नेते झालेले रमेशराव पोकळे हे सर्व सामान्य नागरिक शेतकरी व्यवसायिक सुशिक्षित बेरोजगार यांच्या संपर्कात राहून त्यांच्या प्रश्नासाठी अहोरात्र काम करणारे नेतृत्व आहेत पोकळे हे भाजपचे जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाचे विचार आचार तळागळातील कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हाभरात पक्षवाढीसाठी कार्य केले आहे.

 

माझी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस लोकनेत्या पंकजाताई मुंडे खासदार प्रितमताई मुंडे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आदींच्या मार्गदर्शनाखाली आपले पक्षकार्य चालू ठेवले आहे तसेच पोकळे यांचे प्रत्येकाशी वैयक्तिक व जिव्हाळ्याचे संबंध आहेत तरी भाजपा पक्षाच्या नेते मंडळींनी मराठवाडा पदवीधर मतदार संघात प्रभावी उमेदवार असलेल्या रमेश पोकळेंनाच उमेदवारी द्यावी त्यांना उमेदवारी दिल्यास उमेदवारीतच आर्धा विजय असून त्यांच्या विजयासाठी कार्यकर्ते जीवाचे रान करतील हे निश्र्चित आहे त्यामुळे भाजपाने इतर कोणालाही उमेदवारी न देता कायम पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या रमेश पोकळेंनाच उमेदवारी द्यावी अशी ही मागणी बीड नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हासरचिटणीस सर्जेराव तात्या तांदळे , भाजपा बीड जिल्हा महासचिव राजेंद्र आण्णा बांगर , भाजपा विद्यार्थी आघाडी बीड जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ सानप यांनी केली आहे.



No comments