Breaking News

जन्मदात्या पित्यालाचं कारट्याने केली मारहाण


मुका पिता बोरीचं झाड तोडू देत नसल्याने झाली मारहाण

पाटीवर लिहिलेले वाचून ठाणे अंमलदार प्रेमचंद वंजारे यांनी घेतली फिर्याद नोंदवून

गौतम बचुटे । केज  

शेतातील बोरीचे झाड तोडण्यास विरोध केला म्हणून जन्मदात्या बापाला मारहाण केल्याची घटना घडली असून फिर्यादीला बोलता येत नसतानाही त्याने खडू आणि पाटीवर लिहून दिल्याचे अवलोकन करून पोलीस ठाणे अंमलदार प्रेमचंद वंजारे यांनी फिर्याद नोंदवून घेतली आहे.

केज तालुक्यातील तांबवा येथील भगवान नारायण चाटे वय ६७ वर्ष यांना बोलता येत नाही. त्यांना दि.६ ऑक्टोबर रोजी त्यांचा मुलाने त्यांच्या शेतातील बोरीचे झाड तोडण्यावरून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच स्वतःच्या मुलाला जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे भगवान चाटे हे त्रासाला कंटाळून स्वतःच्या मुला विरुद्ध तक्रार देण्यासाठी केज पोलीस स्टेशन हजर झाले. त्या वेळी ठाणे अंमलदार प्रेमचंद वंजारे हे कर्तव्यावर होते परंतु तक्रारदाराला बोलता येत नसल्यामुळे त्याची तक्रार कशी नोंदवून घ्यावी? ही मोठी अडचण होती. तसेच घटनेचे अवलोकन होत नव्हते. म्हणून मग वंजारे यांनी त्यांना खुणेनेच लिहीता वाचता येते काय? याची माहिती घेतली. तक्रारदाराला लिहीता वाचता येत होते. मग वंजारे यांनी पाटी आणि खडूच्या मदतीने तक्रादारा कडून एक एक वाक्य व घटनाक्रम समजून घेत त्या बोलता येत नसलेल्या पित्याची त्याच्या मुलाच्या विरुद्ध अदखलपात्र स्वरूपाची तक्रार संगणकावर टंकलिखित करून घेत गुन्हा नोंदवून घेतला. या प्रकरणी जमादार दिनकर पुरी हे करीत आहेत.

पोलीस जमादार प्रेमचंद वंजारे

No comments