Breaking News

पदवीधर निवडणुकीच्या मतदानावर अंशकालीन कर्मचाऱ्यांचा बहिष्कार -रेखा आहेरराव


 शेख कासम । कडा  

महाराष्ट्र शासन निर्णयान्वये पदवीधर अंशकालीन कंत्राटी तत्त्वावर नोकरीची संधी उपलब्ध करून देणे संबंधी धोरणात्मक निर्णय घेऊन सुद्धा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे  महाराष्ट्रात अध्याप सदर निर्णयाची अंमलबजावणी होऊन एक ही अंशकालीन उमेदवारास नियुक्ती मिळाली नाही.

 मागील वीस वर्षांपासून संघर्ष करुन देखील शेवटी पदरी निराशाच तुम्ही आम्हा राज्यातील पदवीधर साठी धोरणात्मक निर्णय घेऊन सुद्धा प्रशासकीय अधिकारी वरील शासन निर्णयाची अंमलबजावली करण्यास उदासीनता दाखवल्यामुळे आम्ही राज्यातील सर्व अंशकालीन कर्मचारी राज्यात होणाऱ्या पदवीधर निवडणूका दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी होणाऱ्या मतदानावर मतदान न करण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा रेखाताई आहेर राव यांच्या आदेशानुसार करण्यात आली असून महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. 

       

प्रदेशाध्यक्ष रेखाताई आहे र राव सातारा प्रदेश सचिव मिलिंद भोले बीड प्रदेश उपाध्यक्ष अब्दुल सईद प्रदेश कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण कोल्हापूर नांदेड जिल्हा अध्यक्ष शेख पाशा उस्मानाबाद भैरव खांडेकर लातूर बोडके नंदकिशोर जालना रमेश गायकवाड हिंगोली बंडू कदम औरंगाबाद उत्तम शिंदे इतर महाराष्ट्रातील सर्व जिल्हाप्रमुख यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. No comments