Breaking News

तिचा जीव जाताच, गाईने सुद्दा हंबरडा फोडला......!


नराधम गिधाडांनी तिच्यावर अत्याचार करून तिचा खून करून सर्व नातीच मिटविली !

गौतम बचुटे । केज   

ती प्रपंचाच्या ओढीने आणि आपल्या चिल्या पिल्याना जगविण्यासाठी दिवस रात्र लोकांच्या शेतात राबराब राबत होती. आपल्या लेकरांच्या मुखात दोन घास जावेत म्हणून; पण त्या नरधमानी तिची अगतिकता आणि तिची गरिबीचा व घरातील अठरा विश्व दारिद्र्याचा गैरफायदा घेतला. लिंगपिसाट गिधाडांनी आधी तिची अब्रू लुटली; अन मग तिचा गळा आवळून तिला कायमची संपविली.

बीड जिल्ह्यातील साळेगाव ता. केज येथील ती अभागी सकाळी उठून घरातील सडासारवण करून स्वयंपाक आटोपून कामाच्या ओढीने अगोदर आपल्या सोबत गाईला घेऊन गेली होती. आज काय होणार? आपण घरी आपल्या लेकरा बाळात परत येणार की नाही? याची तिला पुसटशीही कल्पना नसावी. ती सकाळीच नित्यनियमा प्रमाणे शेतात जात असे. रस्त्यात भेटणाऱ्या प्रत्येकाला हसून बोलत असे. 

ती लगबगीने शेतात पोहोचली. या वर्षी चांगला पाऊस पडल्याने कापूस चांगलाच फुटला होता. म्हणून तिने लगबगीने गाईला शेजारी बांधूले. जेवणाचा डब्बा, वेळा बाजूला ठेवला व कापूस वेचण्यासाठी ओटी कमरेला बांधून ती कापूस वेचण्यात मग्न असताना अचानक एक वासनांध गिधाड तिथे कुणी नसल्याची चाहूल घेऊन आले. त्याने तिच्या शरीराचे लचके तोडीत आपली काम वासना शमविली. त्या नंतर त्याने त्याच्या दुसऱ्या नराधम मित्राला फोन करून बोलविले. त्यानेही पुन्हा तिच्यावर इच्छे विरुद्ध बळजबरी करून बलात्कार केला. त्या नंतर ती अभागी कशी तरी सावरली असावी. ती आता या अन्याविरुद्ध आवाज उठवून झालेला प्रकार व ही आपबित्ती पतीला सांगेल किंवा पोलीसात जाईल; म्हणून त्या दोघांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता तिच्याच स्कार्फने मागून तिच्या गळ्याला फास आवळला. एकाने तिला गच्च धरून ठेवले आणि दुसऱ्याने सर्व ताकद एकवटून एका हिसक्यात फास आवळला. ती काहीच प्रतिकार करू शकली नाही. एका हिसक्यात तिचा खेळ खल्लास झाला. तिने प्राण सोडताना फक्त तिचा हात जमिनीवर आपटून शाप दिला. त्यानी तिचा मृतदेह उचलून दुसरीकडे नेऊन टाकला. जर ती जिवंत राहिली तर आपले खरे नाही. या भीतीपोटी जवळ पडलेला दगड दोनदा तिच्या डोक्यात घातला व विववस्त्र मृत्यूदेह टाकून एकजण मोटार सायकलवरून तर दुसरा आडवाटेने निघून गेला. त्यांनी हे सर्व पूर्वनियोजि पद्धतीने केले. त्याच वेळी दावणीला बांधलेल्या गाईने हंबरडा फोडला. 

गाईलाही समजले असावे की, माझी काळजी घेणारी मालकीण तर गेली; पण मी माझ्या वासराच्या ओढीने घराकडे जाते. माझे वासरू माझी वाट पहाते तसे आता त्या अभागी मातेचे सोहम आणि भैरव ही दोन वासरे आता तिची वाट पहात असतील. त्याना आता त्यांची आई कधीच दिसणार नाही. मी त्यांना कसे सांगू? कसे विलाप करणाऱ्या त्या दोघांना सांगू? आणि हे त्या बाल मनाला कसे समजणार? म्हणून ती गाय मालकिणीचा विवस्त्र पडलेला देह पडलेला असताना हंबरडा फोडीत होती. तिला घरी घेऊन आल्या नंतरही ती गाय तिच्या मालकिणीच्या दोन्ही चिमुकल्याकडे पाहून डोळ्यातून अश्रू गाळीत त्यांना समजावीत होती. त्या गाईनेही अंत्यविधी होई पर्यंत दोन दिवस वैरण पाण्याला शिवले नाही. गाय सुद्धा म्हणीत असेल मला जर माणसांच्या न्यायालयात साक्षी साठी उभे केले तर त्या नराधमांना फासावर लटकविल्या शिवाय मी शांत बसणार नाही.

या वरून असे वाटते की त्या घटनेचा निषेध गाईसारख्या मुक्या प्राण्याने अन्न-पाणी वर्ज्य करून केला. परंतु आम्ही मात्र मिठाची गुळणी धरून गप्प आहोत. 

 ती अभागी ही कुणा लेकराची आई, वृद्ध माता पित्याची मुलगी, भावाची बहीण तर कुणाची पत्नी सुद्दा होती. याचा देखील विचार व्हायला हवा.
No comments