Breaking News

गेवराई तालुक्यात वावरणार्या बिबट्याचा बंदोबस्त करा अमरसिंह पंडित यांनी पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांना दिले निवेदन

 गेवराई ः- तालुक्याच्या हद्दीत वावरणार्या बिबट्यामुळे शेतकरी, शेतमजुरांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली असून सदर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी माजी आ.अमरसिंह पंडित यांनी केली असून त्याबाबत त्यांनी सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांना निवेदन दिले आहे.

गेवराई तालुक्यातील उमापूर, कुरणपिंप्री, बोरगाव, गुंतेगाव, पाथरवाला, खळेगाव, माटेगाव, राक्षसभुवन, पांचाळेश्‍वर, कुंभेजळगाव, ब्रम्हगाव, मालेगाव, गुळज, चकलांबा आदी भागांमध्ये बिबट्याचा वावर प्रचंड प्रमाणात वाढला असून त्यामुळे शेतकरी, शेतमजुर, महिला आणि लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण झाली आहे. या भागात ऊसाचे पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. ऊसासह इतर पिकांना पाणी देण्यासाठी शेतकर्यांना रात्री शेतात जावे लागते कारण दिवसभर महावितरणकडून भारनियमन होत असल्यामुळे शेतकर्यांना रात्री शेतावर जाण्याचीवेळ येते. मात्र बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकर्यांमध्ये चिंता पसरली आहे, आष्टी तालुक्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती गेवराई तालुक्यात होवू नये म्हणून महावितरणने दिवसभराचे भारनियमन रद्द करून कृषीपंपासाठी योग्य दाबाने दिवसभर विद्युत पुरवठा करण्यात यावा तसेच वनविभागाकडून योग्य ठिकाणी सापळे लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी अमरसिंह पंडित यांनी सदर पत्रात केली आहे.

गोदावरी पट्ट्यात शेतकरी व ग्रामस्थांमध्ये बिबट्याची प्रचंड दहशत असून याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी माजी आ.अमरसिंह पंडित यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांना एका पत्राद्वारे केली आहे.


No comments