Breaking News

भाजप पक्षासह सुशिक्षीत बेरोजगारांसाठी कायम रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या रमेश पोकळेंनाच उमेदवारी द्यावी - सभापती महादेव अण्णा बडे


धारूर : भाजप पक्षवाढीसह पक्षाचे विचार जनसामान्यांपर्यत पोहवण्यासाठी व सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम प्रयत्नशील कायम प्रयत्नशील असलेले अभ्यासु व्यक्तिमत्व असलेले रमेश पोकळे मराठवाडा पदवीधर मतदार संघात प्रभावी उमेदवार असुन, भाजपने पोकळेंनाच उमेदवारी द्यावी. त्यांच्या उमेदवारीतच विजय असल्याने पक्षाच्या नेत्यांनी इतर कुणालाही उमेदवारी न देता कायम जनसंपर्कात असलेल्या रमेश  पोकळेंनाच उमेदवारी द्यावी.अशी मागणी भाजप नेते तथा धारूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती महादेव अण्णा बडे यांनी एका प्रसिद्धी पञकाव्दारे केली आहे. 

           

यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पञकात सभापती महादेव अण्णा बडे यांनी म्हटले आहे की, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात सक्रिय झालेले व मुंडे साहेबांच्या मुशीत राजकीय नेते झालेले रमेश पोकळे हे सर्व सामान्य नागरिक,  शेतकरी, व्यवसायिक, सुशिक्षित बेरोजगार यांच्या संपर्कात राहुन त्यांच्या प्रश्नांसाठी अहोरात्र काम करणारे नेतृत्व आहे. पोकळे हे भाजपचे जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप पक्षाचे आचार विचार तळागाळातील कार्यकर्त्यांसह लोकांपर्यंत पोहवत जिल्हाभरात पक्षवाढीचे कार्य केले होते. स्व.साहेबांच्या पश्चात लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्यासह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, पक्षाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, खा. प्रितमताई मुंडे  आदिंच्या मार्गदर्शनाखाली आपले पक्षकार्य, सामाजिक कार्य चालुच ठेवले आहे. पोकळे यांचे पक्षातील नेते, कार्यकर्ते यांच्यासह इतर पक्षातील व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींशी वैयक्तिक व जिव्हाळ्याचे संबंध आहेत. 

ते सिनेट सदस्य असताना त्यांनी अनेक सुशिक्षित बेरोजगारांचे अनेक प्रश्न मार्गी लागले असुन, सध्याही त्यांचे कार्य निस्वार्थीपणे चालुच आहे. त्यामुळे प्रत्येक पदवीधर मतदाराला पोकळे हे आपलेच वाटत असुन, पोकळेंना उमेदवारी मिळावी म्हणुन सर्वसामान्य कार्यकर्त्त्यांसह प्रत्येक पदवीधराची मागणी आहे. यामुळे भाजप पक्षाच्या नेते मंडळींनी मराठवाडा पदवीधर मतदार संघात प्रभावी उमेदवार असलेल्या रमेश पोकळेंनाच उमेदवारी द्यावी. त्यांना उमेदवारी दिल्यास उमेदवारीतच आर्धा विजय असुन, त्यांच्या विजयासाठी पक्षातील कार्यकर्ते तर जीवचे रान करतीलच,परंतु इतर पक्षातील ही कार्यकर्ते त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करतील हे निश्चित आहे. त्यामुळे भाजपने  इतर कुणालाही उमेदवारी न देता कायम पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या व स्व.मुंडे साहेबांचे शिष्य असलेल्या रमेश पोकळेंनाच उमेदवारी द्यावी. अशी मागणी ही सभापती महादेव अण्णा बडे यांनी केली आहे.No comments