Breaking News

प्रियकरानेचं लुटली तिची अब्रु ...पळवून नेउन पुण्यात केला बलात्कार ; नराधम प्रियकरावर पोलिसात गुन्हा दाखल 

वासनांध प्रियकराला पोलिसांनी केलं गजाआड

गौतम बचुटे । केज 

प्रेयसीला पळवून नेल्या नंतर वासनांध झालेल्या प्रियकराने तिची अब्रु लुटली. ही घटना पुण्यात घडली असून नराधमा विरोधात केज पोलिसात पीडितेच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या नराधमास पोलिसांनी अटक केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार  केज मधील एका तरुणाचे आपल्या भावकीतील तरुणीवर प्रेम जडले. दोघांनी सोबत राहण्याच्या आणा भाका घेतल्या. दरम्यान पळून जाण्याचा निर्णय झाल्या नंतर हे प्रेमीयुगल पुण्यात गेले. 

पुण्यातील काळभोर येथे एका खोलीत वासनांध झालेल्या प्रियकराने तिच्यावर २६ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत तिच्या इच्छे विरुद्ध जबरदस्तीने वारंवार बलात्कार केला.  वासनांध प्रियकराच्या तावडीतून कशीबशी पीडितेने आपली सुटका करवून घेतली. त्यानंतर केजमध्ये आल्या नंतर पोलिस ठाणे गाठून आपल्या सोबत घडलेली आपबिती सांगत नराधम प्रियकरा विरुद्ध तक्रार दाखल केली. पीडितेच्या फिर्यादी वरून आरोपी  विरुद्ध गु. र. नं. ४८०/ २०२० भा. दं. वि. ३७६ (२) (एन) (एन) प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करीत आहेत. 

दरम्यान नराधमास पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला  १२ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

तपासी अधिकारी सपोनि संतोष मिसळे 
No comments