Breaking News

बीड जिल्हयासाठी १५० कोटी अन आष्टी तालुक्यातील शेतकर्‍याला भ्रमाचा भोपळा - आ.सुरेश धसशेख कासम । कडा 

बीड जिल्ह्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून महाविकास आघाडी सरकारने १५० कोटी दिले आहेत. त्यातील आष्टी तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शून्य टक्के म्हणजे अवघे ६ कोटी ही कसली मदत असा प्रश्न आमदार सुरेश धस यांनी उपस्थित करत शेतकऱ्यांना सरकारने फक्त भ्रमाचा भोपळा दाखविला आहे, अस मत त्यांनी व्यक्त केले. 

साबलखेड येथे शरद देसाई व रोहीत देसाई या चुलते-पुतने यांच्या अंबेश्र्वर ट्रेडर्स बिलडींग मटरियल, शेती अवजारे या दालनाचे उदघाटन आमदार धस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी  माजी आमदार साहेबराव दरेकर, परमेश्वर शेळके, रमजान तांबोळी, अनिल ढोबळे, सरपंच- कमल साबळे, अंकुश चव्हाण, नवनाथ गाडे, भाऊसाहेब पाटील, उद्योजक सागर अमले, इंजिनिअर रंगनाथ घोडके, गोपाळभाऊ रक्ताटे यांची उपस्थिती होती. 

आमदार धस म्हणाले की, आष्टी- पाटोदा- शिरुर तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे न करता थेट नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यायला पाहिजे, मात्र तसे झाले नाही. बीड जिल्ह्याला १५० कोटी मिळाले आहेत. त्यातील आष्टी तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शून्य टक्के म्हणजे अवघे ६ कोटी ही कसली मदत असा प्रश्न उपस्थित करुन महाविकास आघाडी सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर आमदार धस यांनी नाराजी व्यक्त केली. No comments