Breaking News

आरक्षण द्या, अन्यथा संघर्ष अटळ ; बीड येथील मराठा आरक्षण विद्यार्थी व युवा परिषदेत राज्य सरकारला आमदार मेटे यांचा इशारा


वारकरी संप्रदाय आ विनायक मेटेंच्या खांद्याला खांदा देऊन मराठा आरक्षणाची लढाई लढेल - हभप मेंगडे महाराज

... तर आज उन्हात बसलेला विद्यार्थी व युवा या सरकारला चटके बसवल्याशिवाय राहणार नाही - आ विनायक मेटे 


बीड :  बीड येथे झालेल्या मराठा आरक्षण विद्यार्थी व युवा परिषदेत मुख्य मार्गदर्शक असलेल्या आ विनायक मेटे यांनी राज्य सरकारला मराठा समाजाच्या आरक्षणासह शैक्षणिक व नौकरी संदर्भातील प्रश्नांबाबत धारेवर धरत राज्य सरकारच्या नाकर्तेपणावर आरोपांच्या फैरी झाडल्या.  मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर राज्यात संघर्ष अटळ असल्याचं सांगत "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब तुमच्या सरकार मधील विजय वडेट्टीवार हा माणूस संविधनाचा भंग करतोय, त्यांना सरकार मध्ये ठेवलं कस ? ताबडतोब त्यांना काडून टाका, त्यांना काढून टाकायची आपल्यात हिंमत नसेल तर सरकार चालवायला आपण सक्षम नाहीत असे आम्ही समजू, तुम्हाला सत्तेचा मोह असल्यामुळे तुम्ही गप्प आहेत.  मात्र हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांना दुःख होत असेल की माझ्या पश्चात शिवसेनेच्या वाघाची शेळी झाली. अशी कडाडून जहरी टीका आ. विनायक मेटे यांनी बीड येथे आयोजित मराठा आरक्षण विद्यार्थी व युवा परिषदेत ते बोलत असताना केली.

 आ. विनायक मेटे म्हणाले की,  अशोक चव्हाण हे मराठा आरक्षणा संदर्भात कुंभकर्णाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्यामुळेच मराठा समाजाला आज उन्हात बसायची वेळ आली. सरकार आणि अशोक चव्हाण मराठा आरक्षणा संदर्भात खोट बोलत आहेत. राज्य सरकार ला वारंवार सुचना करून देखील  काहीच झालं नाही "नाचता येईना अंगण वाकड " अस सरकारच सुरू आहे.

कांग्रेसचा नेमका काय अजेंडा आहे? मराठा समाजाला आरक्षण द्यायचं कि नाही? मराठा समाजाला बरबाद करायचं काम अशोक चव्हाण करत आहेत का? याचे उत्तर मंत्री बाळासाहेब थोरात यांनी द्यावी. वडेट्टीवार याना ओबीसीचा मसिहा बनायचं आहे म्हणून इतर समाजला दूषण देत आहेत. मात्र तुम्ही मराठा समाजाचे वाईट चिंतु नका, हा इशारा आहे तुम्हाला असे आ विनायक मेटे म्हणाले. 'राज्य सरकार मधील मंत्री मराठा आरक्षणा विरोधात बोलत आहेत म्हणूनच  येत्या 7 तारखेला मुंबईत मातोश्री वर मशाल मार्च निघणार आहे, जर मुख्यमंत्री यांनी लक्ष दिले नाही तर मशाल मार्चच्या ठिणग्या महाराष्ट्र भर पेटतील. मराठा समाज आणि इतर समाजाचा अंत पाहू नका नाहीतर एक दिवस ही जनता तुम्हाला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही. असे आ. मेटे म्हणाले.

अतिवृष्टीमुळे शेतकरी फीस भरू शकत नाही असे असताना आरक्षणाचा विषय होत नाही, शिक्षण घ्यावं कसं? राज्य सरकारने आम्हाला कोणतं आरक्षण देता ते सांगाव !  एसईबीसीचे आरक्षण मिळेपर्यंत इडब्लूएसचे आरक्षण द्या. ८ दिवसात आरक्षण नाही दिले तर १७ तारखेला सरकारच्या विरोधात उच्च न्यायालयात पिटीशन करणार असल्याचे आ विनायक मेटे यांनी सांगितले. इडब्लूएस हे केंद्र सरकारचे आरक्षण आहे. राज्य सरकारला अडकवण्याचा अधिकार नाही. ताबडतोब ईडब्लूएसमधून आरक्षण दिले तर मराठा समाजाच्या मुलामुलींचे हित होईल अन्यथा राज्यात असंतोष माजेल. निर्णय घेतले गेले नाही तर दिवाळी नंतर पुन्हा राज्यात मराठा आरक्षण संघर्ष यात्रा काढणार असल्याचे आ मेटे यांनी सांगितले. मराठा समाजाच्या विरोधात इतर समाज घालायचा अजेंडा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राबवत आहेत. आता समाजाला राज्य सरकार वर विश्वास राहिला नाही.. येत्या सात तारखेला मातोश्री वर मशाल मार्च झाल्यावर कारवाई नाही केल्यास 10 तारखेला राज्यपालांची भेट घेऊन हे सरकार निकम्मे आहे हे सांगणार आहोत. आदरणीय खा.शरद पवार यांना मराठा समाज सोडून इतर समाजाचे प्रश्न सोडायला वेळ आहे. इतर बाबींच्या बैठका मराठा आरक्षणासंदर्भात राष्ट्रवादीला बैठक घ्यायला वेळ नाही, काँग्रेस आरक्षणाच्या विरोधात आहे, शिवसेनेची मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट आहे यामुळं हे महाविकास आघाडी सरकार आरक्षण देणार नाही. या पुढच्या काळात अनेक आंदोलने होत आहेत. सर्व नेत्याना एकत्रित आले तरच सरकारला घाम फुटेल अन्यथा भांडण लावून देतील मराठा समजत संभ्रम पसरवत आहेत. असे ते म्हणाले. 


कोण काय म्हणाले ....

ऍड श्रीराम पिंगळे यावेळी म्हणाले कि, येत्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये लवकरात लवकर घटनापीठाची स्थापना करून सदर घटनापीठासमोर मराठा आरक्षणाची सुनावणी करण्यात येईल यासाठी राज्य शासनाने लक्ष घालावे, दरम्यानच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठवण्याबाबत युक्तिवाद केला जाण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आ विनायक मेटे हे आरक्षणासाठी योग्य दिशेने प्रयत्न करत असून त्यांच्या प्रयत्नांना यश नक्कीच येईल असे ऍड श्रीराम पिंगळे म्हणाले.

त्यांच्यानंतर गायकवाड आयोगाचे श्री सर्जेराव निमसे यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले कि देशामध्ये ज्या काही जाती आरक्षणासाठी लढा उभा करत आहेत, त्यामध्ये मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात जे काही कागदपत्रे, पुरावे सर्वोच्च न्यायालयात दाखल केले आहेत, त्यावरून मराठ्यांना १००% आरक्षण मिळायलाच हवे. उच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणावर सुनावणी होत असताना देखील उच्च न्यायालयाने असा निर्वाळा दिलेला आहे कि, न्यायालयात दाखल केलेल्या पुराव्यांवरून मराठ्यांना आरक्षण मिळायला हवे, मात्र सर्वोच्च न्यायालयात घटनापीठाकडे वर्ग करताना स्थगिती आली. येत्या काळामध्ये घटनापीठासमोर मराठा आरक्षणासमोरील स्थगिती उठेल मात्र यासाठी राज्य शासनाला चांगली चांगली बाजू मांडावी लागेल. त्यानंतर त्यांनी मराठा समाजामधील दयनीय अवस्थेवर प्रकाश टाकला.

यानंतर निमंत्रितांच्या वतीने ऍड शशिकांत सावंत यांनी आरक्षण मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील असे म्हंटले. तोपर्यंत १० % आरक्षण लाभ राज्य शासनांनी मराठ्यांना द्यावा या आ विनायक मेटे यांच्या मागणीला त्यांनी पुढे करत हे आरक्षण द्यायलाच हवे अशी भूमिका मांडली. 

 

हभप मेंगडे महाराज म्हणाले कि, यापुढे वारकरी संप्रदाय आ मेटे साहेबांच्या खांद्याला खांदा देऊन मराठा आरक्षणाची लढाई लढेल व प्रबोधनाच्या माध्यमातून तळागाळापर्यंत मराठा आरक्षणाची ज्योत पोहोच करेल.

यावेळी या परिषदेचे निमंत्रक सुधीर काकडे, अशोक सुखवसे, राहुल टेकाळे, मुकुंद गोरे, ऍड शशिकांत सावंत, ऍड योगेश शेळके, ऍड गणेश मस्के, ऍड योगेश टेकाडे, सोमनाथ मोटे, अजय शिंदे(वडवणी), महारुद्र जाधव यांच्यासह प्रदेश प्रवक्ता तुषार काकडे, वाशीम जिल्हाध्यक्ष प्रशांत गोळे, सरचिटणीस अनिल घुमरे, सुहास पाटील, विनोद कवडे,  तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे, लिंबराज वाघ, कैलास माने, सुनील आडसूळ, ज्ञानेश्वर चौधरी, ज्ञानेश पानसंबळ, सचिन मिसाळ, शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मीराताई डावकर, युवक जिल्हा सरचिटणीस विनोद हातागळे, गणेश मोरे, रामदास नाईकवाडे, युवक तालुकाध्यक्ष गणेश साबळे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे, मनोज जाधव, बळीराम थापडे, गोपीनाथ घुमरे, राजेंद्र माने, रमेश चव्हाण, नितीन आगवान, गणेश धोंडरे, अझहरभाई, जिल्हा उपाध्यक्ष अक्षय माने, शहराध्यक्ष सौरभ तांबे, सुशील तांबे, सामाजिक न्याय सरचिटणीस प्रेम धायजे, आकाश मस्के ,मुस्तफा, कुरे, अमजद पठाण, शैलेश सुरवसे, नंदाताई पायाळ, लालाभाई शेख, हनुमंत पवार, सातीराम ढोले, हरीश शिंदे, शेजाळ, सुशांत सत्राळकर, सलमान अली, स्वप्नील हातागळे, आदींसह शिवसंग्राम पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्र संचालन  राजेंद्र आमटे, मनोज जाधव,माजी सभापती ज्ञानेश्वर कोकाटे, प्रशांत डोरले यांनी केले. 

दोन ठिकाणांहून शेकडो दुचाकींसह परिषदेला आले मराठा युवक 

बीड तालुक्यातील गोरक्षनाथ टेकडी ते बीड व मांजरसुंबा ते बीड व्हाया परिषदेचे ठिकाण असलेल्या सूर्या लॉन्स येथे शोकडो दुचाकींसह दोन्ही ठिकाणावरून युवकांनी या परिषदेसाठी उपस्थिती दर्शवली. गोरक्षनाथ टेकडी येथून आलेली रॅली हि पिंपळनेर व नाळवंडी सर्कल येथून तर मांजरसुंबा येथून आलेली रॅलीमध्ये नेकनूर, चौसाळा सर्कलमधील युवकांचा सहभाग होता...No comments