Breaking News

पदवीधर मतदारसंघातून रमेश पोकळे यांनाच उमेदवारी देण्याची जनभावना !

 


बीड : गत दोन दशकाहून अधिक काळ भारतीय जनता पार्टी साठी दिवस-रात्र एक करून आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब, दीनदलित, दुबळ्या, अनाथ, अपंग, शेतकरी, कामगार, शेतमजूर यांच्या साठी अहोरात्र लढा देणारे... तसेच सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न सातत्याने तडीस लावण्यासाठी आपला आवाज बुलंद करणारे... लोकप्रिय भारतीय जनता पार्टीचे तरुण तडफदार कार्यकर्ते रमेश भाऊ पोकळे यांनाच मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची पक्षाची उमेदवारी देऊन त्यांना आमदार करण्याचे स्वप्न तमाम मराठवाड्यातील सुशिक्षित बेरोजगार पदवीधर पाहत असताना त्यांनाच उमेदवारी देऊन आमदार करावे, अशी सर्वत्र जनभावना आहे!

बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि महाराष्ट्रासह तमाम हिंदुस्थानला या पवित्र, क्रांतिकारी मातीचा सुगंध देणारे लोकनेते गोपीनाथ रावजी मुंडे साहेब यांचे अत्यंत निष्ठावान, विश्वासू, जिवलग कार्यकर्ते... अशी प्रतिमा असणारे रमेशभाऊ हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा.पंकजाताई मुंडे, खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे आदीसह भाजपाच्या वरिष्ठ केंद्रीय आणि राज्य पातळीवर नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्र पक्षासाठी ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये लढा देत आहेत. आजपर्यंत कुठलीही अपेक्षा आणि स्वार्थ न पाहता अत्यंत दिलखुलासपणे पक्षासाठी, पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी त्यांनी योगदान दिलेले आहे, हे कोणालाही नाकारता येणार नाही.

दरम्यान, नुकत्याच येऊ घातलेल्या मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने बीड जिल्ह्यातील हा भाजपाचा ढाण्या वाघ अशी प्रतिमा असलेले आदरणीय रमेश भाऊ पोकळे यांना पक्षाने उमेदवारी दिल्यास तमाम सुशिक्षित,व तमाम पदवीधर युवक मतदार त्यांनाच पसंती देऊन आपला प्रतिनिधी निवडेल..! यात कसलीही शंका राहिलेली नाही; आणि म्हणून याची दखल घेऊन पक्षाने सन्माननीय रमेश भाऊ पोकळे यांना उमेदवारी देऊन पदवीधरांचा नेता निवडण्यासाठी योगदान द्यावे, अशी तीव्र जनभावना मराठवाड्यातील शहरी आणि ग्रामीण भागातून व्यक्त केली जात आहे, पक्षाने संधी द्यावी अशी मागणी बीड विधानसभा विस्तारक आबासाहेब पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी केली आहे.No comments