Breaking News

शासकीय भावानेच आपले धान्य विक्री करावे -आ. बाळासाहेब आजबे

 


कडा येथे शासकीय भरड धान्य खरेदी केंद्रास मंजुरी 

 

के. के. निकाळजे । आष्टी 

राज्य सरकारच्या वतीने दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड व जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय बीड अंतर्गत खरीप हंगाम सन 2020 -21 अंतर्गत आधारभूत किंमत खरेदी केंद्रास कडा येथे शेतकी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी अंतर्गत ऑनलाईन नोंदणी व खरेदीस परवानगी देण्यात आलेली असून यामध्ये मका, बाजरी व ज्वारी ही धान्य शासकीय हमी भावाने खरेदी केली जाणार आहेत, आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासकीय हमीभावाने आपले धान्य विक्री करावे असे आवाहन आमदार बाळासाहेब आजबे यांनी केले आहे तर शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी घाई करू नये शासकीय कापूस खरेदी केंद्र लवकरच सुरू होणार असल्याचेही आमदार आजबे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी उपस्थित होते. खरीप हंगाम 2020- 21 अंतर्गत कडा येथे शेतकी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी  अंतर्गत शासकीय हमी भावाने भरड धान्य खरेदी केले जाणार आहे यामध्ये  ज्वारी मालदांडी (रु26 40) ज्वारी संकरित रु2620 ,मका( रु1850) बाजरी(रु1150) या शासकीय भावाने खरेदी करण्यात येणार आहे किमान आधारभूत धान्य खरेदी योजनेअंतर्गत सन 2020- 21 मधील भरड धान्य खरेदी करण्याकरिता शासन निर्णयानुसार भरड धान्य खरेदीचा कालावधी दिनांक 1- 11 -2020 ते 31- 12- 2020 असा असणार असून शेतकऱ्यांनी आपल्या मालाची विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे यासाठी 7बारा, 8अ, बँक पासबुक, आधार कार्ड व तलाठी प्रमाणित पिक पेरा हे कागदपत्र आवश्यक आहेत कडा येथील शासकीय धान्य कोठार याठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून यासाठी शेतकऱ्यांनी संग्राम आजबे 98 90 47 707 व शरद आजबे 79 72 20 10 66 यांच्याशी संपर्क साधावा.


No comments