Breaking News

माजलगाव तालुक्यातही शेतकऱ्याला आढळला बिबट्या

प्रतिकात्मक

सावरगाव शिवरात शेतकऱ्यात भितीचे वातावरण

 

बाळासाहेब आडागळे । माजलगाव  

तालुक्यातील सावरगाव शिवारात दि ३० नोव्हेंबर सोमवारी रोजी दुपारी बिबट्या दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे शेतकरी वर्गासह ग्रामस्थांत भिंतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांनी याची माहिती तहसिलदार वैशाली पाटील यांना भ्रमणध्वनीवर कळवली आहे.

माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथील शेतकरी श्रीराम रंगनाथ नाईकनवरे हे दि २९ नोव्हेंबर रविवार रोजी दुपारी शेतात गेले होते. यावेळी सर्वे नं.१११ मध्ये त्यांना अचानक बिबट्या दिसला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर हा बिबट्या गव्हाच्या शेतातून पलिकडे पसार झाला. त्यांनी तातडीने याची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानंतर पंचायत समिती सदस्य मनोज जगताप, सरपंच अभिमान जगताप, सुग्रीव नाईकनवरे, बाबा नाईकनवरे, पिराजी नाईकनवरे यांच्यासह ग्रामस्थांनी पाहणी केली असता परिसरात बिबट्याच्या पावलाचे ठसे आढळले.याची माहिती ग्रामस्थांनी तहसिलदार वैशाली पाटील, वन विभागाच्या अधिकार्‍यांना व पोलीस प्रशासनास दिली आहे. मात्र हे पावलांचे ठसे बिबट्याचेच की अन्य कुणाचे याची खातरजमा वन अधिकारी आल्यानंतरच होईल.



नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी अफवा पसरवू नये- पोनि पाटील 

 वनविभागाकडून खात्रीशीर माहिती मिळेल मात्र पायाचे ठसे बिबट्याचे नसून कोल्ह्या चे असावेत असा अंदाज आहे नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी अफवा पसरवू नये असे आवाहन माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील  यांनी केले. 



(  )

No comments