Breaking News

विज बिल माफ करा - रिपाइंचे तहसीलदारांना निवेदन

गौतम बचुटे । केज  

तालुक्यातील शेतकरी व मागासवर्गीय यांचे वीज बिल माफ करण्याची मागणी रिपाइंच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे. 

या बाबतची माहिती अशी की, कोरोनाच्या संकटाने शेतकरी व व वीज ग्राहक त्रस्त आहे. या बद्दल दि. २५ नोव्हेंबर रोजी रिपाइंच्या वतीने तहसीलदार मेंडके यांना विज बिल माफ करावे. या मागणीचे निवेदन रिपाइंचे जिल्हाकार्याध्यक्ष संदीपान हजारे यांच्या नेतृत्त्वाखाली देण्यात आले. निवेदनावर रवींद्र जोगदंड, दिलीप बनसोडे, विकास मस्के, सुभाष हजारे, उत्तम मस्के, भास्कर मस्के, सुनिल हिरवे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


No comments