Breaking News

शॉर्टसर्किटमुळे एक एकर क्षेत्रातील ऊस व ठिबक जळून खाक !

 


गौतम बचुटे । केज 

तालुक्यातील सातेफळ येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील ऊस व त्यातील ठिबक हे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून भस्मसात झाले आहे. 

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील सातेफळ येथील श्रीनिवास बाबुराव भांगे या शेतकऱ्याच्या गट नंबर ९८ मधील शेतातील ऊस व ठिबक हे विजेच्या शॉर्टसर्किटमुळे जळून भस्मात झाले आहे. यात शेतकऱ्यांचे सुमारे १ लाख रु. चा ऊस आणि २५ हजार रु. किंमतीचे ठिबक संच असे सव्वा लाख रु. नुकसान झाले आहे. या बाबत सदर शेतकऱ्यांनी तहसीलदार आणि वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याकडे तक्रार करीत नुकसान भरपाईची मागणी केली आहे.No comments