Breaking News

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३४ वर्षीय महिलेचा विनयभंग : तिघा विरोधात विनयभंगासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखलगौतम बचुटे  । केज 

तालुक्यातील डोका (हादगाव) येथे एक आदिवासी समाजाची महिला शेतात शेळ्या सामन्यासाठी गेली असता तिला मारहाण करून तिचा विनयभंग केल्या प्रकरणी केज पोलिसात विनयभंगासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील वरपगाव येथील आदिवासी समाजातील एक ३४ वर्षे महिला ही दिनांक २० नोव्हेंबर रोजी तिच्या शेतात सकाळी ११:०० वा. च्या दरम्यान शेतात शेळ्या चारीत असताना त्या ठिकाणी महावीर रामधन भांगे, बापु रामधन भागे बंडू रामधन भांगे सर्व राहणार डोका हे हातात काठ्या घेवुन आले. त्यांनी त्या महिलेस जातीवाचक शिवीगाळ करून तिच्या खांद्यावर हात ठेवुन पदर ओढला. बापु भांगे व बाळु भांगे यांनी तिच्या अंगाशी झोंबाझोंबी केली. तसेच तिला हातातील काठीने मारहाण केली. 

या प्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादी वरून केज पोलीस स्टेशनला महावीर रामधन भांगे, बापु रामधन भांगे, बंडू रामधन भांगे यांच्या विरुद्ध गु.र.नं. ४९९/२०२० भा.दं.वि. ३५४, ३५४(अ), ३२४, ५०४, ५०६, ३४ सह अनुसूचित जाती जमाती अन्याय प्रतिबंधक कायदा ३ (१) (आर), ३ (१) (एस), ३ (१) (डब्ल्यू) (i), ३ (१) (डब्ल्यू) (ii) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत हे पुढील तपास करीत आहेत.

No comments