Breaking News

कृषी विभागा तर्फे खांडे पारगाव येथे मोफत बियाणे व औषधे वाटप

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सुरवात  बीड :  तालुका कृषी विभागांतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत पौष्टीक तृणधान्य विकास कार्यक्रम अंतर्गत तालुककृषी अधिकारी मुनेश्वर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बीड तालुक्यातील सर्व गावामध्ये राबवले जात आहे या योजने अंतर्गत खांडे पारगाव येथे कृषी परिवेशक शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व  कृषी सहाय्यक संगीता राठोड यांच्या पुढाकाराने महाबीज चे ज्वारी बियाणे,तणनाशक, व इतर औषधे वाटप करण्यात आले तसेच शेतकऱ्यांना हरभरा बियाणे 50% सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आले.
  

या वेळी खांडे पारगाव येथील राजेंद्र आमटे,नितीन आमटे, आत्माराम आमटे, नारायण अवघड, संतोष आमटे, रणजित सपकाळ,गोवर्धन सपकाळ, प्रदीप आमटे, नवनाथ सपकाळ, अभिमान आमटे, विश्वाभर आमटे, आदी शेतकरी उपस्थित होते.


No comments