Breaking News

बेरोजगार पदवीधर व पदवीधर कर्मचार्‍यांच्या हक्कासाठी निवडणूक लढवणार - सिद्धेश्वर मुंडे

 


११ नोव्हेबर रोजी औरंगाबाद येथे उमेदवारी अर्ज दाखल करणार !

परळी / बीड :  नुकतीच औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीत मागील अनेक वर्षापासून बेरोजगार पदवीधर व विविध विभागातील कर्मचार्‍याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असून त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मराठवाडा विभागातील पदवीधर तसेच विविध संघटनेच्या पदधिकार्‍यांची बैठक परळी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे पार पडली त्यात सिद्धेश्वर मुंडे यांना एकमताने उमेदवारी देण्यात आली.यावेळी बोलताना सिद्धेश्वर मुंडे म्हणाले की बेरोजगार पदवीधर व पदवीधर कर्मचारर्‍याना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी हि निवडणूक लढवणार असल्याचे सिद्धेश्वर मुंडे यांनी सांगितले.

 

या बैठकीत बोलताना सिद्धेश्वर मुंडे म्हणाले की,अनेक वर्षापासून असलेल्या पदवीधरांच्या प्रस्थापित आमदारांनी बेरोजगार पदवीधर तसेच शासनाच्या सर्व विभागात कार्यरत असलेले शिक्षक, विनाअनुदानित शिक्षक, प्राध्यापक, जिल्हा परिषदकर्मचारी, महसुल विभागातील कर्मचारी, एस. टी. कामगार, ग्रामसेवक, संगणकपरिचालक, आयसीटीशिक्षक, अंशकालीनकर्मचारी, पत्रकार, वकील, डॉक्टर, पोलिस कर्मचारी अधिकारी, उमेद कर्मचारी, कोतवाल, पोलिस पाटील, शिपाई, अंगणवाडीसेविका, आशावर्कर, ग्रामरोजगारसेवक, ग्रामपंचायतकर्मचारी, सीएससीकेंद्रचालक, दिव्यांग कर्मचारी, यापैकी कुणाचेच प्रश्न घेतले नाहीत व त्या प्रश्नांची सोडवणूक केली नाही त्याच बरोबर २००५ नंतर नियुक्त झालेल्या कर्मचार्‍याना जुनी पेन्शन योजना लागू केली नाही किंवा कुणाला अनुदान दिले नाही.

त्याचबरोबर मराठवाड्यात सर्वात महत्वाचा प्रश्न बेरोजगारीचा आहे विविध क्षेत्रातील लाखो पदवीधर बरोजगार आहते.शासनाची नौकर भरती मागील ६ वर्षापासून नाही.मराठवाड्यात उद्योग धंदे नाहीत आणि ते आणण्यासाठी पदवीधर आमदार सभागृहात बोलत नाहीत, कौशल्य विभागाच्या योजना नाहीत. मराठवाड्यातील तरुणांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे कोणतेही साधन किंवा अनुदान शासनाने उपलब्ध करून दिलेले नाही आणि ते साधन उपलब्ध करून देण्यासाठी मागील १२ वर्षाच्या काळात सध्याचे आमदार व त्या अगोदरच्या कोणत्याही पदवीधर आमदाराने प्रयत्न केले नाही.यामुळे मराठवाड्यातील सर्व बेरोजगार पदवीधर व पदवीधर शासकीय कर्मचारी यांच्यामध्ये दोन्ही पक्षाच्या उमेदवाराविषयी मोठा असंतोष आहे त्यांनी पदवीधर व सर्व पदवीधर कर्मचार्‍याना गृहीत धरून मुस्कटदाबी केली आहे.त्यामुळे या पदवीधर निवडणुकीच्या माध्यमातून हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी हि निवडणूक आपण लढवणार असून या सर्वांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी या निवडणुकीत उभा राहणार असल्याचे सिद्धेश्वर मुंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

     यावेळी बैठकीला मराठवाड्यातील ८ जिल्ह्यातील पदवीधर तसेच अनेक संघटनेचे पदधिकारी उपस्थित होते.त्यात सर्वांनी सिद्धेश्वर मुंडे यांना एकमताने उमेदवारी दिली असून पदवीधर व सर्व विभागातील शासकीय व कंत्राटी कर्मचार्‍याचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी एकमताने उमेदवारी दिली असून येत्या ११ तारखेला औरंगाबाद येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले.

निवडणूक खर्चासाठी परळीतील पदवीधर व संगणकपरिचालकानी बैठकीत दिले ४ लाख ६१ हजार रुपये


सिद्धेश्वर मुंडे संघटनेचे राज्यअध्यक्ष व  उमेदवार म्हणून उभे राहत असले तरी ते सर्वसामान्य कुटुंबातील आहेत.त्यांनी मागील ७ वर्षात अनेक वेळा नागपुर विधानभवन, सी एस टी मुंबई जाम करणे. त्याच सोबत अनेक चळवळीत सामाजिक कार्य केलेले असून या पदवीधर मतदार संघात त्यांच्या रूपाने एक युवा व तरुण तडफदार उमेदवार देऊन विधानपरिषदेत बेरोजगार पदवीधर व सर्व कर्मचारी यांचे प्रश्न मांडून सोडवण्याची धमक त्यांच्यात असल्याने त्यांना निवडणूक खर्चासाठी परळी तालुक्यातील पदवीधर व संगणकपरिचालकांनी ४ लाख ६१ हजार रुपये दिले.त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.No comments