Breaking News

लोकमान्य टिळक महाविद्यालयात राष्ट्रीय शिक्षक दिवस साजरा

 


जगदीश गोरे । वडवणी

वडवणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात दिनांक ११ नोव्हेंबर २०२०  रोजी भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचा जन्मदिन राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एम. पवार यांच्या हस्ते भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

स्वतंत्र भारताच्या चळवळीत भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम मध्ये ऐक्य रहावे म्हणून मौलाना अबुल कलाम आझाद यांनी अनेक वेळा  प्रयत्न केले. स्वतंत्र भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत १९५२ मध्ये ते पहिल्यांदा निवडून आले आणि स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. असे मनोगत प्राचार्य डॉ. के. एम .पवार यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.सतीश भालेराव कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा.गोपीचंद घायतीडक डॉ. सच्चिदानंद तांदळे डॉ. गोविंदा पांडव  प्रा. सुधीर पोकळे डॉ. राम मायकर प्रा. अशोक खेत्री डॉ. भालचंद्र कुलकर्णी प्रा. संजय साळुंके डॉ. मनीषा ससाने, देविदास दडपे प्रा. जी. के. घोडेराव प्रा. नागनाथ साळुंके प्रा. गोपाळा मस्के प्रा. प्रतिभा शेळके प्रा. ज्ञानेश्वर शेंडगे प्रा. रामेश्वर पवार प्रा. अंकुश पवार डॉ.विकास सिंनगारे, प्रशांत पवार तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.


No comments