Breaking News

सुंदरराव सोळंके महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारमाजलगाव : सुंदरराव सोळंके महाविद्यालयातील कला, विज्ञान वाणिज्य व एम सी व्ही सी मधील बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आ प्रकाशराव सोळंके यांच्या हस्ते करण्यात आला.

  

म शि प्र मंडळाचे अध्यक्ष आ. प्रकाशराव सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला वि. स. सदस्य अण्णाभाऊ वगरे, प्रा. निळकंठ साबळे, डॉ सुनील गरड, इफ्तेखार जकी,डॉ शरद पवार, प्राचार्य डॉ व्ही पी पवार,उपप्राचार्य पवनकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.सुंदरराव सोळंके महाविद्यालयातील बारावी कला, विज्ञान, वाणिज्य व एम सी व्ही सी च्या अनुक्रमे प्रथम द्वितीय, तृतीय आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आ प्रकाशराव सोळंके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कला शाखातील शिनगारे वैष्णवी बाबासाहेब, तौर स्वाती दादाराव, शेख अफरोज रौफ, विज्ञान शाखेतील पाटील प्रथमेश लक्ष्मीकांत, बाराहत्ते श्रष्ठी धर्मराज, कोरडे दत्ता अभिमन्यु, रामदासी  राजकुमार शामसुंदर वाणिज्य शाखेतील जाधव साक्षी रंजितराव,सोळंके अविनाश आण्णासाहेब, सोनवणे वैष्णवी बंडू एम सी व्ही सी इलेक्ट्रॉनिक मधून हावरगावकर विकास अशोक,आडळकर सचिन मुरलीधर, मोमीन जिशान जाकेर ऍटोमोबाईल टेक्नॉलॉजीतील नाईकनवरे रोहन दत्तात्रय, बोचरे शंकर रानुजी, आरडे धनंजय बंडू तर  सी ओ एस एच मधून ढगे मीनाक्षी चंदू,थोरात प्रिती शिवाजी, राठोड काजल कृष्णा तर नीट परीक्षेतुन 568 गुण प्राप्त केलेल्या कदम शिवम भागवतराव यांचा सत्कार करण्यात आला.

    या कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य डॉ  व्ही. पी. पवार यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. लष्मण गिरी तर आभार उपप्राचार्य प्रकाश गवते यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी,पालक प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कोविड19 च्या नियमांचे पालन करण्यात आले.


No comments