Breaking News

पोकळ अन बारगळ गप्पांना पदवीधर बळी पडणार नाहीत; सतिष चव्हाण यांनाचं पसंती- अजय सुरवसे


पकोडे तळा म्हणणारे पदवीधरांना नोकऱ्या देतील काय-  अजय सुरवसे

बीड : बेरोजगार, पदविधरांना नोकऱ्यांचे  रोजगाराचे आमिष आणि आश्वासन देऊन केंद्रात सत्ता काबीज करणाऱ्या भाजपाने सत्ता आल्यानंतर बेरोजगारांनी रोजगार पाहिजे तर पकोडे तळा म्हणून जवाबदारी झटकणारे आज पुन्हा पोकळ अन बारगळ गप्पा मारुन पदवीधरांची दिशाभूल करण्याचं काम करतायत. मात्र त्यांच्या या पोकळ गप्पांना पदवीधर, बेरोजगार, शिक्षक, प्राध्यापक भीक घालणार नसून पदवीधरांचे लढवव्य नेतृत्व म्हणून सतिष चव्हाण यांनाच पसंती देऊन पुन्हा विजयाचा गुलाल उधळणार असल्याचा विश्वास आमदार संदीप क्षीरसागर यांचे खंदे समर्थक अजय सुरवसे यांनी प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केला आहे. 

 


दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की सतिष चव्हाण यांनी वेळोवेळी शिक्षक, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांचे प्रश्न सभागृहात पोटतिडकीने मांडून ते, प्रामाणिकपणे सोडविण्याचे काम केलं आहे. पदवीधरांचे लढवव्य नेतृत्व म्हणून पदवीधरांनी  गेल्या बारा वर्षांपासून त्यांच्यावर विश्वास टाकला आहे, व तो सार्थ ठरला आहे.  पदवीधरांचा चव्हाणांवरील विश्वास कायम असून यंदाच्या पदवीधर निवडणुकीत विजयाचा गुलाल सतिष चव्हाण यांनाच लागणार असल्याने विरोधी उमेदवार धास्तावले आहेत. 

बारा वर्षे सतिष चव्हाण यांनी पदवीधर, शिक्षक, प्राध्यापक यांच्या साठी काय केलं असा प्रश्न विरोधी आणि डम्मी उमेदवार उपस्थित करून पदवीरांमध्ये संभ्रम निर्माण करून दिशाभूल करण्याचं काम करत आहेत. मात्र वास्तविक पदवीधर, शिक्षक आणि प्राध्यापक यांचं सतिष चव्हाण हेच नेतृत्व असल्याचं अनेक निवडणुकीतून पदविधरांनी वारंवार सिध्द केलं आहे. यंदाही पदवीधर, बेरोजगार, शिक्षक, प्राध्यापक यांचा निर्धार कायम असून भाजपा आणि त्यांचे काही डम्मी उमेदवार पोकळ गप्पा मारून संभ्रम निर्माण करत आहेत. मात्र त्यांच्या भूलथापांना पदवीधर बळी पडणार नसल्याचं दिसत आहे. बेरोजगार,  पदवीधरांचा रोजगार नोकऱ्यांच्या प्रश्न असो, तो  शासनदरबारी मांडण्याचा व तो सोडवण्याचा सत्यत्याने सतिष चव्हाण प्रयत्न करत आहेत. 

मात्र रोजगार व नोकऱ्यांचे आश्वासन देऊन सत्तेत आल्यानंतर पकोडे नोकऱ्या नाहीत, रोजगार हवा असेल तर पदवीधारांनी पकोडे तळा, चहाचा गडा टाका म्हणणाऱ्यांना सत्तेच्या हपापलेल्यांना पदवीधर धडा शिकवल्या शिवाय राहणार नाहीत.असेही सुरवसे यांनी पत्रकात नमूद केले आहे.


No comments