Breaking News

तालखेडच्या उपसरपंचावर अविश्‍वास ठराव


ग्रा.पं.च्या भ्रष्ट कारभाराच्या चौकशीसाठी नेमली होती समिती

बाळासाहेब आडागळे । माजलगाव 

तालखेड येथील ग्रामपंचायतअंतर्गत झालेल्या विविध कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याने या भ्रष्टाचाराची चौकशी करावी यासाठी ग्रामपंचायत सदस्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सीईओंच्या आदेशाने चौकशी समितीही नेमली मात्र ही चौकशी थांबवण्यासाठी राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेनेचे सदस्य आणि सरपंच यांनी एकत्र येऊन उपसरपंचावर आज अविश्‍वास ठराव दाखल केला आहे. 

   

तालखेड येथील सरपंच शीतल मुकुंद चौधरी यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायतमध्ये बोगस कामे झाल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य शिवाजीराव मोरे यांनी दाखल केली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांच्या स्वाक्षरीने चौकशी समिती गठीत करण्यात आली. मात्र त्यानंतर राष्ट्रवादी, भाजप व सेनेचे सदस्य आणि सरपंच यांनी एकत्र येऊन आज माकपचे उपसरपंच अनिता विनायक चव्हाण यांच्यावर अविश्‍वास ठराव दाखल केला आहे. 

No comments