Breaking News

माणसाने माणसासोबत कसा व्यवहार करावा याची शिकवण बुद्ध विचारांत - केशव गायकवाड


परळी  : माणसाने माणसासोबत कसा व्यवहार करावा याची शिकवण तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचारांत आहे असे प्रतिपादन नगरसेवक केशव पांडुरंग गायकवाड यांनी  दि.२९ नोव्हेंबर २०२० रोजी परळी येथील त्रिरत्न बौद्ध विहार कमिटी, सिद्धार्थ नगर आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी प्रा.बालाजी साबळे, ज्येष्ठ पत्रकार रानबा गायकवाड, कमिटी अध्यक्ष गौतम साळवे, अमर सूर्यवंशी, गोटू सोनावणे, मनोज मस्के आदी उपस्थित होते. 

      

सविस्तर माहिती अशी की, दर रविवारी घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांच्या तैलचित्राला अभिवादन करून त्रिशरण, पंचशील, बुद्ध वंदना घेण्यात आली. केशव गायकवाड पुढे म्हणाले की, मन हे प्रत्येक गोष्टीचे उगमस्थान आहे. म्हणून तथागत बुद्धांनी मत परिवर्तन आणि नैतिक आचरण यावर भर दिला आहे.  या कार्यक्रमात त्रिरत्न बौद्ध विहार कमिटीचे अध्यक्ष गौतम साळवे, सचिव कैलास तरकसे, कार्याध्यक्ष सोनू ताटे, उपाध्यक्ष विजय हजारे, तुषार गायकवाड, संविधान उजगरे, भारत व्हावळे, समाधान घाडगे, अमर तरकसे, आदींसह या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ऍड.दिलीप उजगरे तर उपस्थितांचे आभार रानबा गायकवाड यांनी मानले.


No comments