Breaking News

दिंद्रुडमध्ये अवैध धंदे बोकाळले !

प्रतिकात्मक

अवैध धंदाचालकांना पोलिसांचे अभय; दिंद्रुडकर  झाले हैराण

 बाबासाहेब देशमाने । दिंद्रुड

दिंद्रुड पोलिस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहतूक केली जात असून , गुटखा, गांजाची विक्री सरार्स होत असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होत आहे. यामुळे दिंद्रुडकर हैराण झाले असून अवैध धंदेचालकांना  पोलिसांचे अभय मिळत असल्याने दिंदृडमध्ये रात्र -दिवस अवैध धंदे जोमात असल्याचे दिसत आहे. 

व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त होऊन उघड्यावर आले आहेत, असं असताना दिंद्रुड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यांनी मात्र उच्छाद मांडला आहे. सर्रासपणे दारु, गुटखा, गांजाची विक्री केली जाते तर अवैधरित्या वाळूचा उपसा ही मोठ्या प्रमाणात केला जात आहे. पोलिसांशी लागेबांधे असल्याने अवैध धंदाचालकांनी धुमाकूळ घातला आहे. 

वाळू टेंडर बंद आसतांना चोरट्या मार्गाने रात्री वाळूची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. राज्यात  गुटखा बंदी असताना दिंद्रुडमध्ये खुलेआमपणे गुटखा विक्री केला जात आहे. शासनाचे आदेश झुगारून या माफीयांनी  तर अवाचा सव्वा भाव लावुन वाळु, गुटखा  विक्री करत आसल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होत असून दिंद्रुडमध्ये राजरोसपणे चालणाऱ्या या अवैध धंद्यावर कोणी अंकुश लावणार आहे का, असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात  आहे. 


No comments