Breaking News

अज्ञात वाहनाच्या धडकेत मस्साजोग येथील तीन‌ दुचाकी स्वार गंभीर जखमी


गौतम बचुटे । केज  

तालुक्यातील मस्साजोग जवळ झालेल्या अपघातात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले आहे.

केज तालुक्यातील मसाजोग  ते हनुमंत पिंपरी या रोडवर दिनांक २० नोव्हेंबर रोजी शुक्रवारी सायंकाळी ६:३० वा.च्या दरम्यान राजेश दशरथ सोनवणे वय ४३वर्षे, मेघराज वसंतराव देशमुख वय ३५ वर्षे आणि विनोद बापू काळे वय ३७ वर्षे सर्व राहणार मस्साजोग हे तिघे मोटारसायकल क्र. एम एच- ४४/पी-६१७६ या दुचाकीवरून हेेे  तिघेजण मस्साजोगकडे येत असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना समोरून जोराची धडक दिली. या अपघातात तिघेही ही गंभीर जखमी असून त्यांच्यावर स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे पुढील उपचार सुरू आहेत. अपघात नंतर अज्ञात वाहनचालक हा अपघातातील जखमींना जाग्यावरच ठेवून त्याच्या ताब्यातील वाहन घेऊन पसार झाला.No comments