Breaking News

महिला महाविद्यालयात संविधान दिवस उत्साहात साजरापरळी वैजनाथ : लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात, भारताचा मानदंड असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी आणि संविधानकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी   संविधान दिन साजरा करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

प्राचार्या डॉ. आर. जे. परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख  हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. व्ही. बी. कवडे प्रा. एस. आर. कोकाट यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रा.से.यो. विभागाचे कार्यक्रम  अधिकारी   प्रा. डॉ. पी. व्ही. गुट्टे यांनी २६/११/१९४९ रोजी स्वीकृत केलेल्या भारतीय संविधानाच्या इतिहासावर प्रकाश टाकला. प्रमुख पाहुण्यांच्या वक्तव्यात, जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि जगातील सर्वात मोठे लिखित संविधान असणाऱ्या भारतदेशाबद्दल गौरवोद्गार काढण्यात आले. भारताचे संविधान म्हणजे भारतीय लोकशाहीचा प्राण आहे आणि त्याचे रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे असेही प्रतिपादन याप्रसंगी करण्यात आले. या कार्यक्रमाचे माहितीपूर्ण सूत्रसंचालन कनिष्ठ महाविद्यालयीन रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रवीण फुटके यांनी केले तर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सह कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. आर. एल. जोशी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. 

      

या कार्यक्रमात प्रा.सौ. के. बी. देशपांडे मॅडम प्रा. डॉ. एस. एस. नेरकर प्रा. प्रवीण नवाडे इत्यादींची उपस्थिती होती उपस्थिती होती. कोरोना संबंधित सर्व खबरदारींचे पालन करत शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.


No comments