Breaking News

शिवसंग्रामच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आ विनायक मेटेंच्या नेतृत्वाखाली घेतली भेटमराठा आरक्षण, मेडिकल प्रवेश, रखडलेल्या नोकरभरतीतील नियुक्तीपत्रे, इडब्लूएस आरक्षणाबाबतच्या मागण्यांचे दिले निवेदन

'मराठा समाजाला आधार देता येईल, यासाठी प्रयत्न करेल' ; राज्यपालांनी शिष्टमंडळाला दिला शब्द

शिवसंग्रामच्या आमदार भारतीताई लव्हेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा होता शिष्टमंडळात समावेश

मुंबई  : राज्य सरकारकडून मशाल मार्चवेळी दिली गेलेली आश्वासने निर्धारित वेळेत पूर्ण केली गेली नाहीत. काल माननीय राज्यपाल भगतिसंह कोश्यारी यांची भेट शिवसंग्राम शिष्टमंडळाने आ विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली घेऊन मराठा आरक्षणा बाबत व समाजाच्या प्रश्नांबाबतचा राज्य सरकारकडून सुरू असलेला हलगर्जीपणा कानावर घातला. यावेळी राज्यपाल महोदयांनी मराठा समाजाच्या मागण्या गंभीरपणे ऐकून घेत, राज्य सरकारला योग्य सूचना करण्याचे आश्वासन दिले व मराठा समाजाला कसा न्याय देता येईल यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. यावेळी शिवसंग्राम-महायुतीच्या आमदार भारतीताई लव्हेकर, ऍड श्रीराम पिंगळे व मराठा क्रांती मोर्च्याचे विविध जिल्ह्यातील समन्वयकांची उपस्थिती होती.

   राज्यपाल महोदयांकडे शिवसंग्राम शिष्टमंडळाने मा. ना. अशोकराव चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजाकरिता स्थापन केलेली मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करणे व नवीन समिती नियुक्त करणे, ना. विजय वडेट्टीवार यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे, सर्वोच्च न्यायालयामध्ये घटनापीठ स्थापन करणे, घटनापीठासमोर अंतरिम स्थगिती उठवण्याबाबत पाठपुरावा करण्यात यावा, आर्थिकदृष्ट्या दुर्लभ घटकांच्या (ईड्ब्लूएस) चा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, राज्यातील मेडिकल प्रवेशामध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ देऊन न्याय द्यावा, इयत्ता ११ वीचे अर्धवट राहिलेले प्रवेश पूर्ण करण्यात यावेत, २०१४ मधील ईएसबीसी व २०१९ - २० मधील ईएसबीसी मधील भरती प्रक्रिया पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये नियुक्तीपत्र देऊन समाविष्ट करावे, छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याबाबत राज्य सरकारने पावले उचलावीत अशा मागण्या निवेदन देऊन केल्या.

   

 "आम्ही आपणाकडे मोठ्या आशेने आमच्या पुढच्या पिढीचा प्रश्न घेऊन आलो आहोत. आघाडी सरकार मराठा समाजाला न्याय देईल असे वाटत नाही.  म्हणून आपणच पुढाकार घेऊन मराठा समाजाचे प्रश्न सोडवावेत अशी विनंती माननीय राज्यपाल महोदयांना केली. वैद्यकीय प्रवेश घेण्यास फक्त २ दिवस राहिले आहेत. समाजाचे प्रश्न सुटले नाहीत तर समाजामध्ये प्रचंड असंतोष पसरेल आणि त्याचे पडसाद सर्व राज्यात उमटतील व त्याची जबाबदारी आघाडी सरकारची राहील, या दृष्टीने आपण शासनाला आदेश द्यावेत अशी विनंतीही माननीय राज्यपाल महोदयांना आ विनायक मेटे व शिष्टमंडळाने या भेटीवेळी केली. मराठा क्रांती मोर्चा समन्वयक सिए बी बी जाधव, शिवसंग्रामचे विक्रांत आंब्रे, सत्यवान राऊत, अनुश्री माळगावकर, किशोर चव्हाण, भरत लगड, अमित जाधव, अविनाश सावंत, पुंडलिक मालुसरे, योगेश विचारे, गणेश घोसाळकर, सलीम पटेल आदींसह मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते.No comments