Breaking News

बिबट्या पकडला जात नाही, तोपर्यंत नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे - पोनि सलीम चाऊस


के. के. निकाळजे । आष्टी  

सध्या आष्टी परिसरात एक नरभक्षक बिबट्या फिरत आहे.दोन दिवसात त्याने दोन व्यक्तींना ठार केले आहे. सध्याची परिस्थिती पाहता सर्व पिके शेतामध्ये उभी आहेत आणि बिबट्या लपून कुठेही आणि केव्हाही हल्ला करू शकतो.

आष्टी तालुक्यातील परिसरातील सर्व नागरिकांनी स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्यावी.त्यामध्ये घराच्या बाहेर शक्यतो जाणे टाळा,जाणे आवश्यक असल्यास गळ्यात मफलर किंवा जाड टॉवेल चादर असं काहीतरी गुंडाळा सोबत दांडा किंवा काठी काहीतरी हातात असू द्या,  त्याचबरोबर एकापेक्षा जास्त लोकांनी मिळून जायचं आहे. जाताना आपल्या सोबत मोबाईल असेल तर मोठ्या आवाजात स्पीकर ऑन करून गाणे किंवा काहीतरी संगीत लावा जेणेकरून जवळपास तो असेल तर त्या आवाजाच्यामुळे बिबट्या जवळ येणार नाही.लहान मुलांना मैदानात किंवा बाहेर खेळायला जाऊ देऊ नका.जोपर्यंत बिबट्या पकडला जात नाही  तोपर्यंत नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. पोलीस स्टेशन आष्टीकडून सर्वांना असे आवाहन आष्टी पोलीस स्टेशनचे पो.नि.सलीम चाऊस यांनी केले आहे.


No comments