Breaking News

दर्शना रोडेचे सुयश


परळी :
अन्नतंत्र विषयाच्या पदवीत्तर प्रवेशाची अखिल भारतीय प्रवेश पात्रता परीक्षेत यशस्वी होऊन कु. दर्शना दिलीप रोडे हिने मुंबई येथील इन्स्टिटयूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मध्ये एम-टेक या पदवीत्तर अभ्यासक्रमासाठी प्रथम क्रमांकाने प्रवेश मिळवला आहे.

               

या  एम-टेक अभ्यासक्रमासाठी  अखिल भारतीय प्रवेश पात्रता परीक्षेतून फक्त १८ जणांची निवड करण्यात येते त्यामध्ये कु. दर्शना दिलीप रोडे हिने प्रथम स्थान प्राप्त करून प्रवेश मिळवला आहे. त्या बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

            

परळी नगर परिषदेचे कार्यालयीन सहायक अधीक्षक दिलीप रोडे यांची ती सुकन्या असून तिने औरंगाबादच्या क्विनस फाऊंडेशन कॉलेज मधून अन्नतंत्रज्ञान विषयात बी-टेक पदवी संपादित केले असून पुढील पदवीत्तर शिक्षणासाठी तिने अखिल भारतीय प्रवेश पात्रता चाचणी यशस्वी करून मुंबई येथील अन्नतंत्रज्ञान विषयातील देशातील नामांकित इन्स्टिटयूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या संस्थेत पदवीत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. No comments