Breaking News

कोरोना रोखण्यासाठी शिव शारदा पब्लिक स्कूल मध्ये विद्यार्थ्यांची तपासणी


गेवराई :  राज्य सरकारच्या सुचनेनुसार २३ नोव्हेबर पासून ईयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंत च्या शाळा सुरू झाल्या आहेत.शिव शारदा पब्लिक स्कूल गढी या शाळेत कोरोना या साथरोग आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विद्यार्थ्यांची  कडक तपासणी केली जात आहे.  
आतापर्यंत शिव शारदा पब्लिक स्कूलचे इयत्ता नववी व दहावीचे १९५ विद्यार्थी  आॅनलाइन क्लास द्वारे शिक्षण घेत होते. आता.राज्य सरकारच्या सुचनेनुसार २३ नोव्हेबर पासून ईयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंत च्या शाळा सुरू झाल्या आहेत.
त्या पार्श्वभूमीवर शाळेने कोव्हिड-१९ रोखण्यासाठी खबरदारी घेत शाळेच्या मुख्य द्वारावरच तापमान  व इतर बारीक सारीक लक्षणा विषयी माहिती घेऊन कडक तपासणी करण्यात येत असल्याने पालक व विद्यार्थी यांच्या मनातील भिती नाहीशी झाली असून दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत आहे. येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी RT-PCR टेस्ट अगोदर केलेली आहे. दररोज विद्यार्थी बसत असलेले वर्ग सॅनीटाईज केले जात आहेत. विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हात स्वच्छ धुण्यासाठी साबण, पाणी तसेच सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्राचार्य एन. पी. दत्ता हे स्वत: विद्यार्थ्यांच्या आगमना पासून शाळेतुन बाहेर पडे पर्यंत विद्यार्थ्यांना सुचना देत त्यांची जातीने काळजी घेत आहेत असून तसेच ते  सोशल मिडिया च्या माध्यमातून आपल्या पाल्यास शाळेला पाठवण्यासाठी सर्व पालकांना आवाहन करत आहेत. सर्व खबरदारी व आरोग्य विभागाच्या सुचना व नियमांचे पालन करण्याची विनंती केली जात  आहे. शाळेच्या या शिस्तबद्ध नियोजना बद्दल प्राचार्य एन.पी.दत्ता व त्यांच्या सर्व सहकारी कर्मचाऱ्यांना पालक धन्यवाद देत आहेत.

No comments