Breaking News

माजलगावच्या प्रतिमा कांबळेंना पिएचडी


माजलगाव :
माजलगाव येथील प्राचार्य कमलाकरराव कांबळे यांची कन्या प्रतिमा कांबळे यांना स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथून समाजकार्य या विषयात पिएचडी पदवी प्रदान केली आहे. या यशाबद्दल प्रतिमाचे सर्व स्तरातुन अभिनंदन आणि कौतुक होत आहे.

फुले, शाहु, आंबेडकर विचाराचे प्रसिध्द व्याख्याते तथा सिध्देश्वर महाविद्यालयाचे तत्कालिन प्राचार्य डाॅ. कमलाकरराव कांबळे यांची एक मुलगी इंजिनिअर, एक शिक्षीका, एक हाॅंगकाॅग येथे नौकरी करत आहे. मुलगा बारावी वर्गात शिक्षण घेत आहे तर तिसरी मुलगी नांदेड विद्यापीठातुन प्रतिमा कमलाकर कांबळे हिने स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठातुन समाजकार्य या विषयात तिने पिएचडी मिळविली आहे. 

तिला यामध्ये मार्गदर्शक म्हणुन डाॅ. जी. एस. येळणे, कुलसचिव सर्जेराव शिंदे, प्रभारी कुलगुरू भिषण सर मानवलोक समाज विज्ञान महाविद्यालय अंबाजोगाई आणि कांबळे आणि भोजणे परिवाराचे प्रतिमाने आभार व्यक्त केले तर यश संपादन केल्याबद्दल अमरनाथ खुर्पे, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तुकाराम येवले, सुनिल सौंदरमल, पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश मोगरेकर, कमलेश जाब्रस, ओबीसी महासंघ जिल्हाध्यक्ष विलास नेमाणे, प्राचार्य भालचंद्र कराड, डाॅ. मिलींद आवाड, राजेश घोडे यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.No comments