Breaking News

छत्रपतींच्या आशीर्वादाने मावळ्यांच्या बळावर सुराज्य निर्माण करणार - सुरेश पाटोळे


बीड :  सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुरेश पाटोळे यांनी मावळ्यांसह स्व. मुंडे साहेबांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन महाराष्ट्रात छ. शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने व बहुजनांचे दैवत लोकनेते स्व. मुंडे साहेबांच्या प्रेरणेने स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी सुरुवात केली आहे.

      

गोपीनाथगड येथे जाऊन सहकारी मावळ्यांनसह देशाचे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांचे दर्शन घेऊन महाराष्ट्रात शिवसंघर्ष ग्रुप च्या माध्यमातून मोठ्यांचा आशीर्वाद व लहानांच्या सहकार्याने सामाजिक कार्याला सुरवात केली असून त्यांच्या प्रेरणेने सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटोळे काम करणार आहेत.

       त्यावेळी प्रसार माध्यमाशी संवाद साधतांना म्हणाले की, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे कायम अन्यायाविरूध्द उभे राहिलेले लोकनेते होते. राजकारणात व समाजकारणात लागणारी जिद्द, आत्मविश्वास, संयम त्यांच्यात होता. नवा विचार, नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची त्यांची तयारी होती. उपेक्षित शोषित वर्गामधे त्यांनी नवा विश्वास निर्माण केला. हे सर्व करत असतांना त्यांना राजकारणात असलेली अनिश्चितता, अपयश, जिवघेणी स्पर्धा याला सामोरे जावे लागले. ऊसतोड कामगारांचे नेते म्हणुन देखील गोपिनाथ मुंडें यांचे काम फार उत्कृष्ट होते. त्यांच्या स्वतःजवळ साखर कारखाने असुन देखील ज्या ज्या वेळी ऊसतोड कामगार आणि साखर कारखान्यांच्या मालकांमध्ये संघर्ष उभा राहीला होता त्या वेळी मुंडे साहेब हे कामगारांच्या पाठिमागे भक्कमपणे उभे राहीले होते.सर्व सामान्य जनता आणि माझ्या सारख्या सामाजिक कार्य करणाऱ्यां कार्यकर्त्यांला उर्जा व प्रेरणा देणारा गड आहे. असा लोकनेता दुसरा होऊच शकत नाही. असेही सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुरेश पाटोळे सांगितले. 


No comments