Breaking News

सेवानिवृत्ती निमित्त पारखे आणि इंगळे यांचा सत्कार


गौतम बचुटे । केज 

स्वच्छता निरीक्षक राजाभाऊ पारखे आणि शिखर बँकेचे बंडू पाटील हे सेवानिवृत्त झाल्या बद्दल त्यांचा साळेगाव येथे सत्कार करण्यात आला.

साळेगाव ता केज येथील रहिवाशी बंडू इंगळे पाटील हे पुणे येथे शिखर बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत होते. तसेच राजाभाऊ पारखे हे सोलापूर महानगर पालिकेत स्वच्छता निरिक्षक म्हणून कार्यरत होते. विहित वयोमर्यादे नुसार ते दोघेही सेवानिवृत्त झाले. त्या बद्दल साळेगाव येथे त्यांचा शाल, फेटा व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी वसंत दादा पारखे, विजय इंगळे पाटील, ज्ञानेश्वर इंगळे पाटील, पत्रकार गौतम बचुटे, बाळासाहेब बचुटे, अझीम पठाण हे उपस्थित होते.No comments