Breaking News

पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

 


गौतम बचुटे । केज   

तालुक्यातील केवड येथे पतीच्या त्रासाला व जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तिच्या पती विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपा वरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या बाबतची माहिती अशी की केज तालुक्यातील सविता रामदास कोल्हे हिने दि. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७:०० वा. च्या दरम्यान केवड ता. केज येथे पतीच्या नेहमीच्या भांडणाला व त्रासाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या बाबत मयत विवाहितेचा भाऊ आत्माराम महादेव गायकवाड रा. भाटसांगवी ता. कळंब जि. उस्मानाबाद यांच्या फिर्यादी वरून मयत्तेचा पती रामदास कोल्हे याच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ४७४/२०२० भा. दं. वि. ३०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करीत आहेत.
No comments