Breaking News

रामलिंग पतसंस्थेकडून सभासदांना १५ टक्के लाभांश तर कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर


गुरुवारपासून सभासदांना लाभांशाचे वाटप होणार - चेअरमन झाडे 

जगदीश गोरे । वडवणी

संपूर्ण मराठवाड्यातील सहकार क्षेत्रात नामांकित असलेल्या वडवणी येथील रामलिंग नागरी सहकारी पतसंस्था मर्या.ता.वडवणी यांच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी संस्थेच्या सभासदांना १५ टक्के लाभांश वाटप तसेच सर्व कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा अतिरिक्त पगार दिवाळी बोनस म्हणून जाहीर करण्यात आला आहे. उद्या गुरुवार दि.५ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता सर्व सन्माननीय संचालक मंडळाच्या उपस्थित संस्थेच्या सभासदांना लाभांश वाटपास सुरुवात केली जाणार असून सभासदांना लाभांश वाटपापोटी एकूण ७ लाख ७१ हजार ३३४ रुपये एवढी रक्कम सर्व सभासदांना लाभांश म्हणून वाटप केली जाणार आहे. तरी सर्व सभासद बांधवांनी पतसंस्थेत येऊन आपली लाभांश रक्कम हस्तगत करावी असे आवाहन चेअरमन कचरुशेठ झाडे यांनी केले आहे. 

                    

याबाबत अधिक माहिती अशी की, संपूर्ण मराठवाड्यातील सहकार क्षेत्रात नामांकित असलेल्या वडवणी येथील रामलिंग नागरी सहकारी पतसंस्था मर्या.ता.वडवणी यांच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी संस्थेच्या सभासदांना १५ टक्के लाभांश वाटप तसेच सर्व कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा अतिरिक्त पगार दिवाळी बोनस म्हणून जाहीर करण्यात आला आहे. उद्या गुरुवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता सर्व सन्माननीय संचालक मंडळाच्या उपस्थितीत संस्थेच्या सभासदांना लाभांश वाटपास सुरुवात केली जाणार आहे. सध्याच्या कोरोना प्रादुर्भावामुळे संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे शक्य नसल्याने संस्थेतील महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्याचे सर्वाधिकार हे संचालक मंडळास देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेला आहे. 

संस्थेच्या सभासदांना दिवाळीपूर्वी लाभांश देणे आवश्यक आहे परंतु शासन निर्देशानुसार सर्व वार्षिक सर्वसाधारण सभा ह्या मार्च २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. सभासदांना लाभांश वाटप करणे, आर्थिक ताळेबंद पत्रकास मंजुरी देणे, पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे, लेखापरिक्षकांची नियुक्ती करणे इत्यादी महत्त्वपूर्ण निर्णय यापूर्वी फक्त सभासदांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतच घेतले जात होते. परंतु हे वरील निर्णय आता संचालक मंडळास घेण्यास राज्य शासनाने व मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याने रामलिंग पतसंस्थेच्या वतीने संचालक मंडळाच्या बैठकीत हे निर्णय संमत करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे रामलिंग पतसंस्थेच्या वतीने या दिवाळीमध्ये सर्व सभासदांना १५ टक्के लाभांश प्रमाणे तब्बल एकूण रक्कम ७ लाख ७१ हजार ३३४ रुपये एवढ्या लाभांश रकमेचे वाटप केले जाणार असल्याने सर्व सभासदांची दिवाळी यंदाही गोड होणार आहे. तसेच पतसंस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनाही प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी एक महिन्याचा पगार दिवाळी बोनस म्हणून जाहीर करण्यात आला आहे. संपूर्ण मराठवाड्यात अग्रगण्य असलेल्या या रामलिंग पतसंस्थेत आज आखेर एकूण ठेवी २८ कोटी ३१ लाख रुपये असून गुंतवणूक १५ कोटी १५ लाख रुपये, कर्ज वाटप १८ कोटी ७९ लाख रुपये तर नफा ३५ लाख ३६ हजार रुपये व संस्थेचा निधी ४ कोटी ६९ लाख रुपये आहे. अशाप्रकारे संस्थेची स्थिती एकदम सुदृढ व भक्कम स्थिती असून तज्ञ संचालक मंडळाची उत्कृष्ट कार्यप्रणाली, कर्तव्यदक्ष कर्मचारी वृंद तसेच विश्वासू सभासद व दक्ष हजारो ग्राहक यांच्या बळावर रामलिंग पतसंस्थेच्या यशाचा आलेख उत्तरोत्तर वाढतच आहे. उद्या गुरुवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ठीक ११ वाजता पतसंस्थेच्या इमारतीत संस्थेच्या सर्व सभासदांना १५ टक्के लाभांश रक्कमेचे वाटप सुरु केले जाणार असून तरी सर्व सभासदांनी पतसंस्थेतून आपली लाभांश रक्कम हस्तगत करावी असे आवाहन रामलिंग नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन कचरुशेठ झाडे, व्हाईस चेअरमन सर्जेराव महाराज आळणे, संस्थापक अध्यक्ष हनुमंतराव डीगे, माजी चेअरमन नारायणराव डीगे, सर्वश्री संचालक नवनाथराव म्हेत्रे, अरुणराव गुरसाळी, सुरेशराव ढवळशंक, डॉ.पुरुषोत्तमजी डीगे, उपमन्युजी वारे, प्रमोदजी जाधव, बाबासाहेबजी मस्के, सौ.शैलजाताई अर्जुनराव भंडारे, सौ.रंजनाताई शिवाजीराव टकले, व्यवस्थापक दिगांबर गुरसाळी यांसह सर्व कर्मचारी वृंद यांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments