Breaking News

आरटीईच्या फि परतव्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करा

   

आमदार प्रकाश दादा सोळंके कडे इसा संघटनेची मागणी

माजलगाव  :  इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा आरटिईचा मागील तीन वर्षापासून चा फि परतवा शासनाने द्यावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा या विषयी माजलगाव तालुका इसा संघटनेच्या वतीने आमदार प्रकाश दादा सोळंके  यांना दि.31,  वार शनिवार  रोजी निवेदन देण्यात आले.

 

लॉकडाऊन मुळे शाळा बंद अन ऑनलाइन शिक्षण सुरू अशी परिस्थिती आहे. गेल्या आठ महिन्यापासून प्रत्यक्ष शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. सध्या मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळा मोठ्या अडचणीत आले आहेत. या अडचणीतील शाळांना शासनाने गेल्या तीन वर्षांपासून थकीत असलेल्या आरटीईचा फी परतावा द्यावा यासाठी इसा संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार यांना निवेदन देऊन आमचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी करण्यात येत आहे. दि.31,  वार शनिवार  रोजी रोजी माजलगाव चे आमदार श्री प्रकाश दादा सोळंके यांना माजलगाव तालुका इसा संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात संघटनेच्यावतीने आरटीईचा फि परतवा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.,

 

त्याच बरोबर मार्च महिन्यापासून कोरोनामुळे प्रत्येक शाळा बंद आहेत. मात्र ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. शासनाच्या धोरणामुळे इंग्रजी माध्यमांच्या  शाळेमधील शिक्षकावर उपासमारीची वेळ आली आहे. विद्यार्थ्याकडून फीस वसुली होत नसल्याने शिक्षकांचे पगार थकले आहेत. शाळा मोठ्या अडचणीत आले आहेत. अशा बिकट परिस्थितीमध्ये शासनाने इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा गेल्या तीन वर्षांपासून थकीत असलेला फी परतावा देऊन सर्वांची दिवाळी गोड करावी. यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने शासनाकडे आमच्या मागणीचा पाठपुरावा करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी इसा संघटनेचे सह सचिव निखिल वाघमारे  तालुका अध्यक्ष गणेश घायतिडक , बीड जिल्हा  अध्यक्ष दिलीप पारेकर, शेख चांद, कलीम इनामदार, मिटकरी सर, गणेश बादाडे, गणेश गटकल,खाडे सर, पवार सर, जरे सर, आदी उपस्थित होते.


No comments