Breaking News

आ. संदिप क्षीरसागर गावातच बसून सोडवू लागले नागरिकांच्या समस्या!

 


राजुरी जि.प.गटातील अनेक गावांमध्ये साधला संवाद; नारायणगडावर शिवाजी महाराजांचे घेतले आशिर्वाद 

बीड : मागील चार दिवसापासून राजुरी जिल्हा परिषद गटातील अनेक गावात गावकरी, शेतकरी, तरूण बांधव, वयोवृद्ध यांच्याशी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी संवाद साधत गावातील गावातच बसून सर्व सामान्य लोकांच्या अडीअडचणी समजून घेत सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. आमदार आपल्यादारी या अभियानाच्या माध्यमातून आ.संदिप  क्षीरसागर गावातील लोकांशी चर्चा करून गावातील समस्या गावातच सोडवत असून प्रशासकीय पातळीवर अडचणींचा, प्रश्नांचाही तोडगा गावातच काढत आहेत. सर्वांचे श्रद्धास्थान असलेले जिल्ह्याची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड येथे नगद नारायण महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेत महंत शिवाजी महाराज यांचे आ. संदिप क्षीरसागर यांनी आशिर्वाद घेतले. 
कोरोनासारख्या महामारीमुळे सर्व सामान्य लोकांना तालुक्याच्या ठिकाणी येणे शक्य नाही म्हणून आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी आमदार आपल्यादारी अभियान चालू केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावातील मुलभूत सुविधा, शेती, शेतकरी, तरूण, वयोवृद्ध यांच्या समस्या व विकास कामांबाबत गावातील लोकांशी चर्चा करून प्रशासकीय पातळीवरील अडचणी, प्रश्न गावातील पारावर बसून सोडवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. गेल्या चार दिवसापासून राजुरी जिल्हा परिषद गटातील अनेक गावांमध्ये ते भेटी देत आहेत. 

आज त्यांनी श्री क्षेत्र नारायणगड येथे नगर नारायण महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेत महंत शिवाजी महाराज यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बबन गवते, पंचायत समिती सदस्य सचिन शेळके, संजय गांधी निराधार समितीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब डावकर, भगवानराव बहिर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. No comments