Breaking News

बसस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ सुरू करा - मल्हार सेनेची मागणी


माजलगाव :  येथील  बस स्थानकात निगरानी साठी बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या दोन महिन्यापासून बंद पडले आहेत.सद्यस्थिती सणासुदीचा कालावधी असून दरम्यानच्या काळात विघटन अप्रिय घटना घडण्यापूर्वीच दक्षता म्हणून तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी मल्हार सेनेच्या वतीने आगार प्रमुखांना शुक्रवार दि.6 रोजी करण्यात आली.

तिसरा डोळा म्हणून बस स्थानकावर देखरेख करणारे सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहेत. बसस्थानकाचा विस्तार पाहता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला नागरिकांची रहदारी असते.यापूर्वी या ठिकाणी चोरी मारामारीच्या अनेक घटना घडल्या आहेत त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे उघडकीस आल्या आहेत.त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आळा बसला होता. परंतु गेल्या दोन महिन्यापासून  सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत.सद्यस्थितीत सणासुदीचा काळ आहे.त्यामुळे आगार प्रमुखांनी तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करावेत, नुसता 12 नोव्हेंबर रोजी आपल्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा मल्हार सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक डोने तालुका प्रमुख  विलास नेमाने, कृष्णा ठोंबरे यांनी दिला आहे.


No comments