Breaking News

कोरोना काळातील डाॅक्टरांचे कार्य प्रेरणादायक -जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

 


गौतम बचुटे । केज 
 

गायत्री हाॅसपीटल लातुर येथे कोरोना कालावधी मध्ये कुटुंबाची पर्वा न करता युद्धातील सैनिका प्रमाणे डॉक्टर्स, नर्स व सर्व कर्मचारी रात्रंदिवस राबले. म्हणुन लातुर व परिसरातील रुग्णांचे प्राण वाचवले. अशा कर्मचाऱ्यांचे कौतुक करणे हे कर्तव्य आहे.असे गौरवोदगार जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी काढले.

कोरोनाच्या काळात लातूर येथील डॉ. रमेश भराटे यांच्या गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथील आरोग्य आणि वैद्यकीय सेवेतील सर्व डॉक्टर्स, नर्सेस, टेक्निशियन आणि त्याना मदत करणारे सर्व कर्मचारी हे युद्धातील लढवय्या सैनिक प्रमाणे आपल्या व कुटुंबाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून प्राणाची तमा न बाळगता अत्यंत कर्तव्य कठोर भावनेने केलेले सेवाभावी काम हे कौतुकास पात्र व प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी जी. श्रीधर यांनी काढले. 

कोरोना सारख्या अत्यंत जोखमीच्या काळात लातूर येथील डॉ. रमेश भराटे यांच्या गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने केलेल्या कार्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणुन मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आ. विक्रम काळे हे ऊपस्थित होते. रुग्ण व डॉक्टर्स यांचे नाते कौटुंबिक असते असे त्यांनी नमुद केले. या वेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डाॅ. एल.एस. देशमुख यांनी पण विचार व्यक्त केले. या वेळी गायत्री हाॅसपीटल लातुरचे संचालक व प्रसिद्ध श्वसन विकार तज्ञ डाॅ. रमेश भराटे यांचा कोरोना कालावधी मध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या वेळी आय.एम.ए. च्या डाॅ. सुरेखा काळे, सचिव डाॅ चांद पटेल, डाॅ. श्रीधर पाठक याची ऊपस्थिती होती.


No comments