Breaking News

माणिकराव पाळवदे कुटुंबियांचे प्रा.उत्तम धुमाळ यांच्या कडून सांत्वनपरळी वैजनाथ  :  माजी उपसरपंच तथा सेवा सहकारी सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन माणिकराव जगन्नाथ पाळवदे यांच्या दुःखद निधनाबद्द प्रा.डॉ.उत्तम धुमाळ यांनी हेळंब येथील निवास्थानी भेट देऊन पाळवदे कुटुंबियांची त्यांचे सांत्वन केले. 

            Z

परळी तालुक्यातील मौजे हेळंब येथील जेष्ठ राजकिय सामाजीक क्षेत्रातील व्यक्तीमत्व सेवा सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन माणिकराव पाळवदे यांचे (92) व्यावर्षी दि.27 आँक्टोंबर रोजी  निधन झाले होते. माणिकराव पाळवदे यांच्या निधनाने हेळंब व परिसरात तसेच ग्रामीण भागातील सर्वापरिचित व्यक्तीमत्व होते. त्यांच्या जाण्याने ग्रामीण भागातील शेतकरी व सर्व सामान्याच्या मदतीला धावून येणारे व्यक्तिमत्व हरपले असून  त्यांच्या आठवणी परळीकरांच्या कायम स्मरणात राहतील असे धुमाळ सर म्हणाले. 

        

 तसेच प्रा. डॉ. उत्तम धुमाळ सर यांनी कै. माणिकराव जगन्नाथ पाळवदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी प्रा.डॉ.उत्तम धुमाळ यांच्यासह इतर नागरिक यांच्यासह पाळवदे  कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी विठ्ठलराव आंधळे, प्रा.नारायण पाळवदे, प्रा.डॉ.नागोराव पाळवदे, हेळंबचे उपसरपंच राम पाळवदे व पाळवदे परिवार उपस्थित होते.


No comments