Breaking News

शिक्षकाने मागासवर्गीय कुटुंबास केली शिवीगाळ शिक्षकावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

गौतम बचुटे । केज  

जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका सहशिक्षकाने एका मागासवर्गीय कुटुंबास जातीवाचक शिवीगाळ केली आहे.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात समर्थ नगरमध्ये पाडुळे कुटुंब राहत असून हे मातंग समाजाचे आहेत. दि. २३ नोव्हेंबर रोजी पाडुळे यांच्या मुलीस वृक्षकेतू संगेवार हा पेशाने शिक्षक असलेल्या व्यक्तीने भांडण केले. त्याचा जाब जनाबाई पाडुळे-खाडे यांनी विचारला असता; त्या शिक्षकाने त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे बोलला. 

या प्रकरणी जनाबाई खाडे-पाडुळे यांनी दि. २८ नोव्हेंबर रोजी केज पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी वरून वृक्षकेतू संगेवार या शिक्षकाच्या विरुद्ध गु.र.नं. ५१४/२०२० भा.दं.वि. ५०९, ५०४ आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक अधिनियम कायदा ३ (१) (आर) (एस) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत हे पुढील तपास करीत आहेत.

जनाबाई खाडे-पाडुळे या कट्टर आंबेडकरवादी असून यांनी कौटुंबिक हिंसाचार व समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक तुटणारे संसार जोडले आहेत हे विशेष !


No comments