Breaking News

हे सरकार पलटुराम सरकार, कोणत्याच आश्वासणावर ठाम नाही - आ. सुरेश धस

आष्टी महावितरण कार्यालयासमोर भाजपच्या वतीने वाढीव बिलाची होळी

के. के. निकाळजे । आष्टी 

भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोमवारी महावितरण कार्यालयासमोर चुकीच्या वाढीव वीजबिल आकारणी विरुद्ध आ.सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली विज बील होळी आंदोलन करण्यात आले.

यावेळी आ.सुरेश धस यांनी राज्य सरकारवर टिकास्ञ सोडले.ते म्हणाले की,या राज्य सरकारमध्ये कसलाच ताळमेळ राहिलेला नाही.हे सरकार तीन तोंडाचे सरकार आहे.या राज्याचे मंत्री १०० युनिटपर्यंत वीज मोफत देऊ अशा प्रकारची घोषणा करतात आणि त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात वीज बिल माफ करणे धोकादायक असल्याचे सांगतात.ग्राहकांना बिल देखील किती यावे याचे लिमिट राहिलेले नाही. एक बल्प आणि एक टयुब असलेल्या ग्राहकाला साठ हजार रुपयांपर्यंतचे बिल आकारले जाते.राज्याचे ऊर्जामंत्री म्हणतात बिल दुरुस्त करू,माञ ते प्रत्येक वेळा वेगवेगळे बोलतात.यामुळे राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी या सरकारला जी पलटूराम ही उपाधी दिली आहे ती माझ्या मते एकदम बरोबर आहे.हे सरकार दर आठ दिवसाला पलट्या मारणारे सरकार असल्याने हे सरकार पलटूराम सरकार आहे असेही आ. सुरेश धस यावेळी म्हणाले.

यावेळी सभापती बद्रीनाथ जगताप,नगराध्यक्ष भारत मुरकुटे,माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे,सरपंच अतुल कोठुळे,सुनिल रेडेकर,यशवंत खंडागळे,मनोज सुरवसे,खंडू जाधव,अशोक मुळे,सुनील रेडेकर,निलेश होनकसे,सचिन लोखंडे,प्रदिप लोखंडे,किशोर झरेकर,बाळासाहेब घोडके,शैलेश सहस्त्रबुद्धे ज्योतिबा रेडेकर,सचिन मुळे,चिंटू आग्रवाल,शफी सय्यद,गणेश शिंदे,अक्षय धोंडे,विजय धोंडे,बबन कदम,रिजवान शेख,संतोष रणसिंग,सादिक कुरेशी, आदी उपस्थित होते.No comments